परेवर ३६ सरकते जिने
By admin | Published: January 11, 2016 02:18 AM2016-01-11T02:18:31+5:302016-01-11T02:18:31+5:30
मध्य रेल्वेवर सरकत्या जिन्यांचा वर्षाव केला जात असतानाच पश्चिम रेल्वेवरही मोठ्या प्रमाणात सरकते जिने बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २0१६मध्ये नवीन ३६ सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.
मुंबई : मध्य रेल्वेवर सरकत्या जिन्यांचा वर्षाव केला जात असतानाच पश्चिम रेल्वेवरही मोठ्या प्रमाणात सरकते जिने बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २0१६मध्ये नवीन ३६ सरकते जिने बसवण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेमार्गावर यंदा ४0 सरकते जिने बसवण्यात येतील. सध्या म.रे.च्या ५ स्थानकांवर सरकते जिने आहेत. यात ठाणे, दादर, डोंबिवली, कल्याण स्थानकात प्रत्येकी २ आणि विक्रोळी स्थानकात १ सरकता जिना बांधण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवरही सरकते जिने बांधण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे आणि एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एकूण ५0 सरकते जिने बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. यात पश्चिम रेल्वेच्या २२ आणि एमआरव्हीसीच्या २८ सरकत्या जिन्यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेकडून दादर, विलेपार्ले, अंधेरी, बोरीवली स्थानकात प्रत्येकी १ तर एमआरव्हीसीकडून अंधेरीत ६, गोरेगावमध्ये ३ आणि बोरीवलीत १ असे एकूण १४ सरकते जिने बसवण्यात आले आहेत.
तर २0१६मध्ये पश्चिम रेल्वेकडून प्रत्येकी ४ सरकते जिने वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल टर्मिनसवर बसवण्यात येणार आहेत. तर अंधेरी, भार्इंदर, बोरीवली, दादर आणि मीरारोडमध्ये प्रत्येकी १ तर मुंबई सेंट्रल लोकल मार्गावर २, विलेपार्लेत १ आणि विरारमध्ये २ जिने बसविले जातील.
एमआरव्हीसीकडूनही सुरुवातीला ५ सरकते जिने बसवण्यात येणार असून, यामध्ये बोरीवलीत ३ आणि विलेपार्ले, कांदिवली, गोरेगावमध्ये प्रत्येकी १ जिना बसवण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.