पर्युषण हा आत्मा उपासना करण्याचा एक महान आध्यात्मिक उत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 02:00 AM2020-08-19T02:00:01+5:302020-08-19T02:00:44+5:30
जगभरातील भाविक याचा लाभ घेत असून, महावीरांच्या भाषणाचे प्रवचन ऐकून त्यांना फायदा होत आहे.
मुंबई : जैन धर्मातील पर्युषण महापर्वात अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक प्रसिद्ध जैनाचार्य डॉ. लोकेशजी यांच्या व्याख्यानमाला विविध विषयांवर नियमितपणे फेसबुक लाइव्हद्वारे आॅनलाइन प्रसारित केल्या जात आहेत. जगभरातील भाविक याचा लाभ घेत असून, महावीरांच्या भाषणाचे प्रवचन ऐकून त्यांना फायदा होत आहे.
अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य लोकेशजी यांनी सांगितले की, भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात. त्यातील काही स्थानिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय सण आहेत. पर्युषण हा आत्मपूजेचा एक महान आध्यात्मिक सण आहे. या दरम्यान, सर्व बांधव हा महान सण लाभदायक ठरावा यासाठी त्यांच्या अंतर्गत आध्यात्मिक शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न करण्यावर भर देत आहेत. आपले शरीर केवळ हाडांचा पुतळाच नाही तर त्यात जगाची सर्वोच्च शक्ती असते. याद्वारे आपण आध्यात्मिक विधीद्वारे जागृत होऊ शकतो. यानिमित्ताने बंधू आणि भगिनी आपला आत्मा पवित्र व शुद्ध होण्यासाठी विविध आध्यात्मिक विधी, जसे की त्याग, तपश्चर्या, ध्यान, आत्म-अध्ययन यात स्वत:ला अर्पण करीत आहेत. जैन धर्मात जन्मलेल्या प्रत्येक भक्ताची अशी इच्छा असते की, त्यांनी महापर्वाच्या वेळी अधिकाधिक धार्मिक, आध्यात्मिक प्रवृत्तींमध्ये सामील व्हावे. या वर्षापासून कोरोना साथीच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व जनाचार्य यांनी कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे. अहिंसा विश्व भारती संस्थेने पूज्य आचार्य लोकेशजी यांचे आॅनलाइन व्याख्यान आयोजित करण्याचे ठरविले. जेणेकरून कोरोना साथीच्या वेळी लोकांना घरी बसून धार्मिक, आध्यात्मिक क्रिया चालू ठेवता येतील.
>अहिंसा विश्व भारती : २२ आॅगस्टपर्यंत कार्यक्रम सुरू राहतील.
१९ आॅगस्ट - शांततेचा संदेश आणि ध्यानयोग, २० आॅगस्ट - ज्ञानाचा मार्ग, स्वाध्याय योग, २१ आॅगस्ट - समता योग, अध्यात्माचे सार, २२ आॅगस्ट - क्षमाशीलता हाच खरा दागिना