मुरुडमध्ये पाळला शहीद दिन
By admin | Published: March 23, 2015 10:42 PM2015-03-23T22:42:51+5:302015-03-23T22:42:51+5:30
क्रांतिकारी संघटनेचे पदाधिकारी मात्र हा दिवस वैयक्तिकरीत्या करून या क्रांतिवीरांना गेल्या अनेक वर्षांपासून अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहत आहेत.
आगरदांडा : क्रांतिवीर भगतसिंग यांचा आज ८४ वा स्मृतिदिन हा ‘ शहीद दिन’ म्हणून पाळला जातो. महाड येथील मोहन करंदेकर आणि क्रांतिकारी संघटनेचे पदाधिकारी मात्र हा दिवस वैयक्तिकरीत्या करून या क्रांतिवीरांना गेल्या अनेक वर्षांपासून अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहत आहेत.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या स्वातंत्र्यसैनिकांचा ब्रिटिश साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त करण्याचा ध्यास होता. हा ध्यास अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहिला. त्यावेळी वयोवृद्ध लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉडर्स या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्यामुळे त्यांना फासावर लटकविले. प्राणांचे बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे कार्य बहुमूल्य मानणाऱ्या समाजसेवक मोहन करंदेकर यांनी हा दिवस वैयक्तिकरीत्या करण्याचे ठरविले. १९८५ मध्ये त्यांनी क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. ठाणे महानगरपालिकेत बांधकाम विभागात काम करीत असताना त्यांनी ठाण्यातील निवासस्थानी हा दिवस पाळला. निवृत्तीनंतर मूळ मुक्कामी परतलेले करंदेकर स्वत:च्या निवासस्थानी हा दिवस करीत आहेत. शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह मंगल पांडे, मादाम कामा, चंद्रशेखर, सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके, भाई कोतवाल, भारतमातेच्या प्रतिमांचे पूजन होते. दिवसभर निर्जळी उपवास करतात. मुरुड शहरातील नगरसेवक अविनाश दांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)