Join us

'पासबान' कडून होतोय  रोज ३०  हजार गरजूना अन्न पुरवठा !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 8:18 PM

गेल्या दशकभरापासून देशी संस्कृती, भाषाचा प्रसार आणि सामाजिक सोहार्दसाठीच्या कामामुळे ओळखल्या जाणाऱ्या 'पासबान ए आदब' ही  सामाजिक संस्था  कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात मदतकार्यात आघाडीवर राहिली आहे.

  

आयजी कैसर खालिद यांचे नेटके नियोजन 

मुंबई :  गेल्या दशकभरापासून देशी संस्कृती, भाषाचा प्रसार आणि सामाजिक सोहार्दसाठीच्या कामामुळे ओळखल्या जाणाऱ्या 'पासबान ए आदब' ही  सामाजिक संस्था  कोरोना विषाणूच्या संक्रमण काळात मदतकार्यात आघाडीवर राहिली आहे. संस्थेच्या वतीने मुंबई महानगरात दररोज 30 हजार गरजूना अन्नपूरवठा करण्यात येत आहे.  विशेष महानिरीक्षक (पीसीआर ) कैसर खालिद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत संस्थेकडून अन्नदानाबरोबरच महामार्गांवर चालकांना कोरोनाबाबत जागरूकतेचे धडे दिले जात आहेत. त्यासाठी शेकडो स्वयसेवक कार्यरत आहेत. 

 

 

 

पासबान ए अदब  संस्था साहित्य आणि संस्कृती जोपासण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबवत असते.  अनेक वर्ष उर्दू आणि मराठी भाषेतील मान्यवर साहित्यीकांना सोबत घेऊन अनेक कार्यक्रम  आयोजित करते. गेल्या 23 मार्चपासून लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे कामगार, कष्टकरी नागरिककाचे मोठे हाल होत आहेत. हे लक्षात आल्याने संस्थेकडून  गरजू घटकांना थेट मदत पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे. मुंबई, ठाणे, वसई, , पालघर परीसरातील  गरीब आणि गरजू वस्त्यांमध्ये रोजच्या जेवणाच्या फुडपॅकेट्स चे वितरण करणे, अन्नधान्यांची शिधा पुरवणे.  विविध भागांत अडकलेल्या असंघटीत कामगारांपर्यंत आणि गरजू व्यक्तीपर्यंत एका फोन कॉलवर स्वयंसेवकांमार्फत मदत पोहोचविली जात आहे.

शिवाजीनगर, गोवंडी, देवनार, पांजरपोळ, तुर्भे, मानखुर्द, वडाळा, मुंब्रा इत्यादी विभागात गरजू कुटुंबांना पासबान ए अदब तर्फे अन्नधान्याची घरपोच सेवा पुरवली जाते. संस्थेचे अनेक  कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संस्था वाशीतील एपीएमसी  मार्केटमधून भाजीपाला विकत घेणे, स्वयंपाक करणे, पॅकेट्स बनवणे, आणि त्याचे वितरण करण्यासाठी स्वयंसेवकाची यंत्रणा आरोग्यविषयक नियमांचे काटेकोर पालन करून कार्यरत आहे. 

 

 

 

गरजूना आधाराची गरज : खालिद 

 

 

या संकटाच्या काळात कामगार, गरीब वर्गाचे मोठे हाल होत आहेत, त्यांना दोन वेळेचा शिधा मिळणे गरजेचे असल्याने संस्थेकडून गेल्या 40 दिवसापासून त्यासाठी प्रयत्न करीत आहे. 

- कैसर खालिद (विशेष महानिरीक्षक व अध्यक्ष,  पासबान ए अदब )

टॅग्स :अन्नकोरोना सकारात्मक बातम्या