Join us

प्रवाशाने तक्रारच केली नाही; पोलिसांचे स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 12:56 AM

गोरेगाव ‘ओला’ चालक धमकी प्रकरण

मुंबई : कॅबचे बिल रोख रकमेच्या स्वरूपात न देता आॅनलाइन दिले म्हणून चालकाने धमकावल्याचे टिष्ट्वट प्रवाशाने मुंबई पोलिसांना केले होते. हे प्रकरण दिंडोशी पोलिसांच्या अखत्यारीत येत असले तरी याबाबत अद्याप प्रवाशाने तक्रारच दाखल केली नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.नवी मुंबईतून गोरेगाव पश्चिमसाठी एक ओला कॅब एका प्रवाशाने बुक केली होती. यासाठी त्याचे भाडे ८०० रुपये होणार होते. मात्र प्रवाशाकडे रोख रक्कम कमी असल्याने त्याने ते आॅनलाइन भरले. मात्र चालक त्याच्याकडून रोख रकमेची मागणी करू लागला. तसेच रोख रक्कम कमी असल्याने आॅनलाइन पैसे भरल्याचे सांगताच चालकाने एका लोखंडी रोडने मला धमकाविले. हा सगळा प्रकार गोरेगाव पूर्वच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर घडला, असे त्या प्रवाशाने टिष्ट्वटमार्फत मुंबई पोलिसांना कळविले. हे प्रकरण दिंडोशी पोलिसांच्या हद्दीत घडले असून त्याची चौकशी पोलीस करतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र टिष्ट्वट करणारा प्रवासी अद्याप प्रत्यक्षात तक्रार करण्यासाठी आला नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरनेंद्र कांबळे यांनी सांगितले. या चालकाला कामावरून काढून टाकले आहे, मात्र प्रवाशाने सहकार्य केल्यास प्रवाशाला न्याय मिळवून देणे सोपे जाईल, असेही पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ओला