प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्रीपासून सहा तासांसाठी राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 05:38 AM2020-01-05T05:38:17+5:302020-01-05T05:38:26+5:30

प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) ५ जानेवारीच्या रात्री ११.४५ ते ६ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

 The passenger reservation system will remain closed for six hours from tonight | प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्रीपासून सहा तासांसाठी राहणार बंद

प्रवासी आरक्षण प्रणाली आज रात्रीपासून सहा तासांसाठी राहणार बंद

Next

मुंबई : प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) ५ जानेवारीच्या रात्री ११.४५ ते ६ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे यावेळेदरम्यान या काळात इंटरॅक्टिव वॉयस रिस्पॉन्स सिस्टीम (आईवीआरएस), करंट रिझर्व्हेशन, रिफंड काउंटर्स, कोचिंग रिफंड टर्मिनल, पीएनआर सेवादेखील बंद असणार आहे.
लांब पल्ल्यांच्या प्रवासी एक्स्प्रेसची भाडेवाढ करण्याचा निर्णय १ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आला. या घोषणेनंतर मध्यरात्री १२ वाजल्यापासून नवे तिकीट दर प्रति किमीप्रमाणे अपलोड करताना तांत्रिक बिघाड आला. परिणामी, रेल्वे प्रवाशांना तिकीट खिडक्यांवरून तिकिटे खरेदी करण्याची वेळ आली होती. संगणकामध्ये डाटा संकलित करण्यासाठी पीआरएस सेवा बंद करण्यात येईल. मुंबईतील रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रावरील संगणकातील डेटा संकलन करण्यासाठी सहा तासांसाठी ही सेवा बंद असेल. या काळातील तिकीट परतावा मॅन्युअली देण्यात येणार आहे.

Web Title:  The passenger reservation system will remain closed for six hours from tonight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.