मध्य रेल्वेचे प्रवासी लटकले

By admin | Published: November 2, 2015 01:49 AM2015-11-02T01:49:06+5:302015-11-02T01:49:06+5:30

कामावरुन रात्री नऊनंतर घरी परतणारे मध्य रेल्वेवरील प्रवासी शुक्रचारी चांगलेच लटकले. चिंचपोकळी स्थानकाजवळ एका लोकलचा बॅटरी बॉक्स रुळावर पडल्याने लोकलमध्ये

The passengers of the Central Railway hanging | मध्य रेल्वेचे प्रवासी लटकले

मध्य रेल्वेचे प्रवासी लटकले

Next

मुंबई : कामावरुन रात्री नऊनंतर घरी परतणारे मध्य रेल्वेवरील प्रवासी शुक्रचारी चांगलेच लटकले. चिंचपोकळी स्थानकाजवळ एका लोकलचा बॅटरी बॉक्स रुळावर पडल्याने लोकलमध्ये तांत्रिक समस्या उद्भवली. त्यामुळे डाऊनला जाणाऱ्या धीम्या लोकल या जलद मार्गावर वळवण्यात आल्या.
सीएसटी - ठाणे लोकल चिंचपोकळी स्थानकाजवळ रात्री नऊच्या सुमारास येताच या लोकलचा एक बॅटरी बॉक्स रुळावर पडल्याने लोकल जागीच थांबली. त्यामुळे मागील लोकलही जागेवरच थांबल्या. सीएसटीपासून दादर स्थानकापर्यंत धीम्या मार्गावरील प्लॅटफॉर्मवर तर प्रचंड गर्दी उसळली. हा बॉक्स खूपच जड असल्याने तो ट्रॅकवरुन हटविल्याशिवाय भायखळा ते परेल दरम्यान ठाणे, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल सुरु करणे कठीण होते. त्यामुळे भायखळा ते परेल दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल या जलद मार्गावर वळवण्यात आल्या. चिंचपोकळी, करी रोड आणि परेल स्थानकात धीम्या लोकल उपलब्ध होत नसल्याने या स्थानकात लोकल पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांचे मात्र हाल झाले. रात्री साडेदहा वाजता हा बॉक्स हटविला.

Web Title: The passengers of the Central Railway hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.