मध्य रेल्वेवर प्रवासी वाढले, दिवा आणि बदलापूर गर्दीची स्थानके

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 05:40 AM2018-09-10T05:40:14+5:302018-09-10T05:40:28+5:30

एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सरासरी रोज ९८ हजार प्रवासी वाढले आहेत.

Passengers on the Central Railway increased, Diva and Badlapur crowded stations | मध्य रेल्वेवर प्रवासी वाढले, दिवा आणि बदलापूर गर्दीची स्थानके

मध्य रेल्वेवर प्रवासी वाढले, दिवा आणि बदलापूर गर्दीची स्थानके

Next

मुंबई : एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सरासरी रोज ९८ हजार प्रवासी वाढले आहेत. गतवर्षी या काळात ६३ कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा यात वाढ होऊन प्रवाशांचा आकडा ६४ कोटी ६३ लाखांपर्यंत पोहोचला असून, प्रवासी संख्येत सुमारे २.३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिवा आणि बदलापूर स्थानकात प्रवाशांमध्ये वाढ झाल्याने गर्दीचे स्थानक म्हणून ही स्थानके नावारूपास येत आहेत.
शहरातील विकासकामांमुळे रस्त्यांवर नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून रेल्वे वाहतुकीला अधिक पसंती देण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेवरील प्रवासी संख्येत १ एप्रिल ते ४ सप्टेंबर या कालावधीत रोज सरासरी ९८ हजार प्रवासी वाढले आहेत. यामुळे मध्य रेल्वेवरील रोज एकूण प्रवाशांची संख्या सरासरी ४२ लाखांहून सुमारे ४३ लाखांपर्यंत पोहोचली आहे. मध्य रेल्वेवरील दिवा आणि बदलापूर स्थानकांतून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे दिवा आणि बदलापूर ही स्थानके गर्दीची स्थानके म्हणून नावारूपास येत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.
>गणेशोत्सवात गर्दी वाढणार
वाहतूककोंडी, हार्बर मार्गाचे विस्तारीकरण यामुळे प्रवाशांचा अधिकाधिक ओढा हा मध्य रेल्वेकडे वाढत आहे. शिवाय ७२ तासांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने पुढील काळातदेखील गर्दीत वाढ होणार असल्याची शक्यता मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी व्यक्त केली.
>यंदाच्या उत्पन्नात ८ कोटींची भर
हार्बर मार्गाचे विस्तारीकरण मध्य रेल्वेच्या पथ्यावर पडल्यामुळे प्रवासी संख्येसह मध्य रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या कालावधीत उपनगरीय तिकीट विक्रीतून मध्य रेल्वेने ४२४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
गतवर्षी एप्रिल ते आॅगस्ट या कालावधीत मध्य रेल्वेने ४१६ कोटींचा आकडा गाठला होता. परिणामी यंदा मध्य रेल्वेच्या उत्पन्नात तब्बल ८ कोटींची घसघशीत वाढ झाल्याचे रेल्वे अधिकाºयांनी सांगितले. सद्य:स्थितीत मध्य रेल्वेच्या १ हजार ७३२ लोकल फेºयांमधून रोज सरासरी ४३ लाख प्रवासी प्रवास करतात. परिणामी मुंबई उपनगरीय लोकलमधून सरासरी ७९ लाख प्रवासी रोज प्रवास करत असून यात पश्चिम रेल्वेच्या
३६ लाख प्रवाशांचाही समावेश आहे.

Web Title: Passengers on the Central Railway increased, Diva and Badlapur crowded stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.