मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक, हार्बरच्या प्रवाशांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 07:52 AM2020-09-05T07:52:32+5:302020-09-05T07:55:13+5:30
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद विशेष सेवा माटुंगा येथून धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.
मुंबई : विविध अभियांत्रिकी व देखभाल दुुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल.
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद विशेष सेवा माटुंगा येथून धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यानंतर मुलुंड येथे पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील.
सकाळी ९.२८ ते दुपारी २.२६ या वेळेत ठाणे येथून सुटणाºया जलद विशेष सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. पुढे माटुंगा येथे पुन्हा अप जलद मार्गावरून गाड्या धावतील.
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ आणि माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी १५.३५ वाजेपर्यंत जम्बोब्लॉक असेल. या काळात सांताक्रुझ आणि माहीम स्थानकांदरम्यान सर्व विशेष गाड्या धिम्या मार्गावर वळविण्यात
येतील.