मुंबई-गोवा मार्गावर प्रवाशांचे हाल
By admin | Published: September 24, 2015 01:58 AM2015-09-24T01:58:14+5:302015-09-24T01:58:14+5:30
गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्यांचे वाहतूककोंडीमुळे प्रचंड हाल झाले. रस्त्याच्या चौपदरीकरणातील मरगळ प्रवाशांच्या मार्गात अडथळा ठरली.
धाटाव : गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्यांचे वाहतूककोंडीमुळे प्रचंड हाल झाले. रस्त्याच्या चौपदरीकरणातील मरगळ प्रवाशांच्या मार्गात अडथळा ठरली.
सुकेळी खिंडीत बुधवारी पहाटेपासून कोंडी निर्माण झाली होती. एसटी बस, खासगी बस तसेच इतर चारचाकी वाहनांची वर्दळ होती. कोलाडकडून मुंबईकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू असल्याने कोंडी झाली. याला पर्याय म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक रोहामार्गे वळविण्यात आली.
पहाटे दोन एक्सप्रेस आणि एक पॅसेंजेर रेल्वे जात असल्याने वाहनचालकांना मोठा फटका बसला. तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाल्यामुळे बाजारपेठेसह रेल्वे फाटकापासून अष्टमी पुलापर्यत वाहनांनच्या रांग लागल्या होत्या. तर रोहा कोलाड रस्त्यावर अशोक नगरपर्यंत वाहनांची गर्दी होती. कोलाड, धाटाव, रोहा मार्गे नागोठणेकडे मंद गतीने सुरू आलेल्या वाहतुकीमुळे २० किलोमीटर लांबीच्या प्रवासाला एक तास उशीरा झाला. पहाटे ६.३० नंतर पुन्हा
वाहतूक सुरळीत झाली आणि प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास
सोडला. (वार्ताहर)