Join us

वांद्रे टर्मिनल्सवरून प्रवाशाचे दागिने घेऊन झाला पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:06 AM

निर्मलनगर पोलिसांकडून रिक्षाचालकाला अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गावी निघालेल्या प्रवाशाचे लाखोंचे दागिने घेऊन रिक्षाचालक शुक्रवारी पसार झाला ...

निर्मलनगर पोलिसांकडून रिक्षाचालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गावी निघालेल्या प्रवाशाचे लाखोंचे दागिने घेऊन रिक्षाचालक शुक्रवारी पसार झाला होता. मात्र निर्मलनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच त्याच्या अटक करून सर्व मुद्देमाल हस्तगत केला.

धारावीत राहणारे मोहम्मद फारुख मणियार (३६) हे गोरखनाथ हे त्यांच्या गावी जाण्यासाठी वांद्रे टर्मिनल्सवर गेले होते. त्याचदरम्यान १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे दागदागिने असलेली त्यांची बॅग अनोळखी इसमाने लंपास केली. याप्रकरणी ७ मार्च, २०२१ रोजी त्यांनी निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार निर्मलनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गीते आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तपासाअंती खारमध्ये राहणाऱ्या विनोदकुमार पाठक (४८) या रिक्षाचालकाने ही चोरी केल्याचे उघड झाले. त्यानुसार त्यांनी पाठकला अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेले दागिनेही हस्तगत करण्यात आले.

..........................................