मागण्यांसाठी प्रवासी वेठीस, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 04:54 AM2018-08-11T04:54:09+5:302018-08-11T04:54:16+5:30

‘काही अपरिहार्य कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल रद्द करण्यात आली आहे, प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत, ही घोषणा मध्य रेल्वेच्या बहुतांश स्थानकांवर शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू होती.

Passengers of the passengers for the demands, the noise of resentment in the passengers | मागण्यांसाठी प्रवासी वेठीस, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

मागण्यांसाठी प्रवासी वेठीस, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर

Next

मुंबई : ‘काही अपरिहार्य कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल रद्द करण्यात आली आहे, प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत, ही घोषणा मध्य रेल्वेच्या बहुतांश स्थानकांवर शुक्रवारी पहाटेपासूनच सुरू होती. मध्य रेल्वेने रिक्त असलेल्या २२९ पदांवर भरती न केल्यामुळे मोटरमनने केवळ नियमानुसार काम करत ओव्हरटाइम करण्यास नकार दिल्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले. मोटरमननी स्वत:च्या मागण्यांसाठी दिवसभर लाखो प्रवाशांना वेठीस धरल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वाहतूक तर कोलमडलीच, पण अपुºया फेºयांमुळे प्रवाशांवर गर्दीत चेंगरत प्रवास करण्याची वेळ आली.
आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील २०० हून अधिक फेºया रद्द झाल्या. दिवसभर वेळापत्रक कोलमडले. सकाळी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. मध्य रेल्वे, मोटरमन संयुक्त कृती समितीच्या बैठकीत, मध्य रेल्वेने भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे आश्वासन दिले. सिग्नल ओलांडल्यामुळे सक्तीने ‘रिटायर’ केलेल्या तीन मोटरमनच्या प्रकरणात वरिष्ठ अधिकाºयांकडून चौकशीचे व कमी शिक्षा देण्याचे आश्वासन दिल्याने संध्याकाळी आंदोलन मागे घेण्यात आले.
>...आणि एक्स्प्रेस सुटली
चेंबूर येथे राहणाºया लक्ष्मण रामाकृष्णन वैद्य हे आपल्या ६५ वर्षीय आईसोबत शुक्रवारी दुपारच्या सुमारास कन्याकुमारी एक्स्प्रेसने प्रवास करणार होते. वैद्य हे चेंबूरने दादर येथे टॅक्सीने पोहोचले. दादर येथून गर्दी असल्यामुळे आईला एक्स्प्रेसमध्ये चढणे शक्य नसल्याने; त्यांनी धिमी लोकल पकडून सीएसएमटी येथून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र भायखळा ते सीएसएमटी येण्यास तब्बल पाऊण तास लागल्यामुळे कन्याकुमारी एक्स्प्रेस सुटल्याचे लक्ष्मण यांनी सांगितले.
हे कधी थांबणार?
कधी पाऊस, कधी ब्लॉक तर कधी तांत्रिक बिघाड यामुळे रेल्वे प्रवासी नेहमीच त्रासलेला असतो. रेल्वे आणि मोटरमन संघटना यांच्या वादात पुन्हा एकदा सामान्य प्रवासी भरडला गेला. अनेक लोकल रद्द झाल्यामुळे स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. लोकलमध्ये चढणे-उतरणेदेखील शक्य होत नव्हते. दादर स्थानकात सायंकाळच्या सुमारास चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. संप करून प्रवाशांना त्रास देण्याचे प्रकार थांबणार तरी कधी ?
- सुकन्या सावंत, प्रवासी, मालाड
>कल्याण ते टिटवाळा १४ मिनिटांऐवजी ५९ मिनिटे
मोटरमन उपलब्ध नसल्याने टिटवाळा-सीएसएमटी सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांची धिमी लोकल जलद लोकल म्हणून चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. मात्र मोटरमन उपलब्ध होण्यास उशीर झाल्याने टिटवाळा स्थानकातूनच ही लोकल १२ वाजून १० मिनिटांनी रवाना झाली. ही लोकल कल्याण स्थानकात दुपारी १२ वाजून ५३ मिनिटांनी पोहोचली. टिटवाळा ते कल्याण या अंतरासाठी साधारणपणे १४ मिनिटे लागतात. मात्र शुक्रवारी हे अंतर पार करण्यासाठी तब्बल एक तास लागल्यामुळे प्रवासी चांगलेच संतापले होते.
>रात्रीही चेंगराचेंगरी : संध्याकाळी आंदोलन मागे घेतले, तरी रात्री उशिरापर्यंत अनेक मोटरमन कामावर न आल्याने वाहतूक प्रचंड कोलमडली. विविध स्थानकांत एवढी गर्दी झाली, की प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. ठाण्यात तर स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाजवळ जमून घोषणा दिल्या.
सद्य:स्थितीत मध्य रेल्वेची एकूण ८९८ पदे मंजूर असून २२९ पदे रिक्त आहेत. मोटरमनची ५० प्रशिक्षणार्थींची एक तुकडी प्रशिक्षित होत आहे. ही तुकडी प्रशिक्षित झाल्यानंतर त्यांची तातडीने मध्य रेल्वेत नियुक्ती करण्यात येणार असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.प्रवाशांतील संताप लक्षात घेऊन रेल्वेने मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची मुभा दिल्याच्या घोषणा सुरू केल्या, पण त्यातही चढणे कठीण बनले. सुरूवातीच्या स्थानकांतच एवढी गर्दी होती, की पुढील स्थानकांत भरलेली गाडी पाहणे प्रवाशांच्या नशिबी आले. त्यामुळे दिवसभर प्रवासी वेठीला धरले गेले.
>‘ये तो चलता रहता है’
आंदोलन मागे घेण्यात आले आहे. हा आमचा अंतर्गत वाद असून ‘ये चलता रहता है’!
- एस.के. जैन,
विभागीय रेल्वे
व्यवस्थापक, मध्य रेल्वे

Web Title: Passengers of the passengers for the demands, the noise of resentment in the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :localलोकल