मुंबई : मध्य रेल्वेच्या हद्दीत पनवेलजवळ शनिवारी मालगाडी घसरल्यामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही वाहतुकीला फटका बसला. कोकण रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक यामुळे विस्कळीत झाले. तसेच काल सायंकाळी घटना घडूनही रद्द गाड्या कोणत्या व घटनेची माहिती प्रवाशांना न मिळाल्याने प्रवासी ७ ते ८ तास गाड्यांत अडकून पडले. तसेच रस्ते मार्गाचा वापर करणाऱ्यांची रिक्षा - टॅक्सी चालकांनी लूट केली.
मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या मांडवी, एलटीटी मंगळूर स्पेशल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या या कल्याण, मिरजमार्गे वळविण्यात आल्या आहेत.
अन्य मार्गे वळविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये सीएसएमटी- मंगळूर तसेच मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचाही समावेश आहे. पनवेल येथून वसईकडे जाणाऱ्या मालगाडीला झालेल्या अपघातामुळे पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे अनेक गाड्या त्यांच्या निर्धारित ठिकाणाआधीच थांबवून शॉर्ट टर्मिनेट केल्या जात आहेत.
विशेषत: कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना देखील याचा फटका बसला आहे. कोकणातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांनी पुन्हा एकदा घरची वाट धरली आहे.
कोणत्या गाड्या रद्द?
रविवारी
रोहा दिवा मेमू
दिवा रोहा मेमू
दिवा चिपळूण एक्स्प्रेस
मंगळुरू एलटीटी एक्स्प्रेस
पनवेल खेड एक्स्प्रेस
खेड पनवेल विस्तार
मडगाव सीएसएमटी एक्स्प्रेस
सावंतवाडी दादर एक्स्प्रेस
सावंतवाडी सीएसएमटी
सीएसएमटी मंगळुरू एक्स्प्रेस
सोमवारी
दादर सावंतवाडी एक्स्प्रेस
सीएसएमटी मडगाव एक्स्प्रेस
मडगाव एलटीटी एक्स्प्रेस
वेळेत बदल
मडगाव नागपूर एक्स्प्रेस - सोमवारी सकाळी ६ वाजता सुटेल.
सीएसएमटी मडगाव ही सोमवारी सकाळी ७. १० वाजता सुटेल. —
रत्नागिरी - दिवा एक्स्प्रेस पनवेलपर्यंत चालविण्यात आली व तेथून पुन्हा रवाना करण्यात आली.
किती गाड्यांना फटका?
५४ रद्द गाड्यांची संख्या
२६ वळविण्यात आलेल्या गाड्या
१२ वेळेत बदल केलेल्या गाड्या
६ शॉर्ट टर्मिनेट केलेल्या गाड्या
४ शॉर्ट ओरिजिन गाड्या