‘वंदे भारत’कडे प्रवाशांनी फिरवली पाठ, शिर्डी-मुंबईसाठी २५ टक्केच बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 10:07 AM2023-02-12T10:07:20+5:302023-02-12T10:08:11+5:30

साईनगर शिर्डी-मुंबईसाठी २५ टक्के बुकिंग

Passengers turned their backs on 'Vande Bharat', only 25 percent booking for Shirdi-Mumbai | ‘वंदे भारत’कडे प्रवाशांनी फिरवली पाठ, शिर्डी-मुंबईसाठी २५ टक्केच बुकिंग

‘वंदे भारत’कडे प्रवाशांनी फिरवली पाठ, शिर्डी-मुंबईसाठी २५ टक्केच बुकिंग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीएसएमटी-साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी-सोलापूर या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखविल्यानंतर त्या दिमाखात गंतव्य स्थानी रवाना झाल्या. मात्र, साईनगर शिर्डीहून मुंबईकडे येणाऱ्या गाडीकडे प्रवाशांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. 

साईनगर शिर्डी आणि सोलापूर या दोन्ही मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांच्या शनिवारपासून नियमित सेवा सुरू झाली. साईनगर शिर्डीहून मुंबईकडे येणाऱ्या गाडीचे आरक्षण फुल्ल झाले होते. शनिवार दुपारपर्यंत चेअर कारला ४१, तर एक्झिक्युटिव्ह क्लासला चार वेटिंग होते. रविवारसाठी सीएसएमटी-साईनगर शिर्डी गाडीसाठी १०२४ पैकी २६८ आणि १०४ एक्झिक्युटिव्हपैकी १५ सीट्स असे एकूण २८३ जागांचेच बुकिंग झाल्याचे स्पष्ट होत आहे. 

सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूर येथून शनिवारपासून सुरू झाली. या गाडीला चेअर कार ८३० आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे ९४ सीट बुकिंग करण्यात आले होते, तर शनिवारच्या मुंबई-सोलापूर गाडीला ८४८ चेअर कार आणि ७१ एक्झिक्युटिव्ह क्लासचे बुकिंग करण्यात आले होते. सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत सुपरफास्ट ट्रेनच्या चेअर कारसाठी १ हजार ३०५ रुपये, तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी २ हजार ३०५ रुपये मोजावे लागणार आहेत, तर दादर -शिर्डी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या स्लीपर सीटला केवळ २५५ रुपये लागणार आहेत.

पहिल्याच दिवशी लेट
मुंबई–सोलापूर वंदे भारत गाडीला पहिल्याच दिवशी लेटमार्क लागला. शनिवारी सोलापूरवरून निघालेली ही गाडी मुंबईला ७ मिनिटे उशिराने पोहोचली. 

रविवारच्या गाडीला चांगला प्रतिसाद
रविवारसाठी शिर्डीहुन मुंबईला येणाऱ्या गाडीला शनिवार दुपारपर्यंत चेअर कारला ४१ आणि एक्झिक्युटिव्ह क्लासला ४ वेटिंग होते. तर रविवारीसाठी असलेल्या सीएसएमटी शिर्डी गाडीसाठी १०२४ चेअर कारपैकी ७४८ आणि १०४ एक्झिक्युटिव्हपैकी ७६ सीट बुक झाले होते. 

१७०० हून अधिक जणांचा प्रवास
मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमधून पहिल्याच दिवशी १७२० प्रवाशांनी प्रवास केला. मुंबई-साईनगर शिर्डी २८३ प्रवासी, सोलापूर-सीएसएमटी ९२४ प्रवासी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसमधून ५१३ प्रवाशांचा समावेश आहे.

 

Web Title: Passengers turned their backs on 'Vande Bharat', only 25 percent booking for Shirdi-Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.