Join us

UTS अ‍ॅपवर आता युनिव्हर्सल पास असणाऱ्या प्रवाश्यांना मिळणार तिकीट  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 8:16 PM

Mumbai Local Tickets : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी आज माहिती दिली की, यूटीएस मोबाईल अ‍ॅप आणि युनिव्हर्सल पास लिंक केल्याने प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय त्यांचे तिकीट आता मिळू शकेल.  

नुंबई -  मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी आज माहिती दिली की, यूटीएस मोबाईल अ‍ॅप आणि युनिव्हर्सल पास लिंक केल्याने प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय त्यांचे तिकीट आता मिळू शकेल.  लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि दुसऱ्या डोसनंतर 14 दिवस उलटून गेलेल्या कोणत्याही व्यक्तीला राज्य सरकारचा युनिव्हर्सल पास घ्यावा लागतो.जो लसीच्या स्थितीची योग्य पडताळणी करण्यासाठी राज्य सरकारच्या पोर्टलद्वारे केला जातो व नंतर पास मिळतो.मग तिकीट घेण्यासाठी प्रवाशांना तिकीट काउंटरवर युनिव्हर्सल पास दाखवावा लागतो मात्र  आता युनिव्हर्सल पास हे यूटीएस मोबाइल अ‍ॅपसह एकत्रित केले गेले आहे, ज्यामध्ये प्रवासी काउंटरवर न जाता अँपद्वारे तिकीट खरेदी करू शकणार आहेत.

 या अ‍ॅपद्वारे प्रवास आणि सीझन तिकीट दोन्ही मिळणार आहेत.  यात सीझन तिकिटांचे नूतनीकरण देखील शक्य आहे.  प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी काउंटरवर जाण्याची गरज नाही.   Android Google Play Store आणि Apple App Store वर UTS अँप उपलब्ध आहे. ज्या प्रवाशांनी आधीच UTS मोबाइल अ‍ॅप डाउनलोड केले आहे .त्यांना ही नवीन उपयुक्तता सक्रिय करण्यासाठी अ‍ॅप अपडेट करणे आवश्यक आहे.

 प्रवाशांच्या लसीकरण स्थितीची पडताळणी करणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने कोविड महामारीदरम्यान UTS मोबाइल अ‍ॅप निलंबित करण्यात आले होते.  आता  सरकारचे युनिव्हर्सल पाससाठीचे पोर्टल आणि रेल्वे यूटीएस मोबाइल अ‍ॅप लिंक करण्यात आले आहे.त्यामुळे पूर्वी प्रमाणे UTS  अँप द्वारे प्रवाश्यांना तिकिटांची सोय करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेमुंबई