Join us  

पश्चिम रेल्वेवर आज प्रवाशांचे होणार हाल; या गाड्यांवर लक्ष ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 8:32 AM

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वैतरणा-साफळे स्थानकांदरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी पाच गर्डर्स टाकण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पश्चिम रेल्वेच्या वैतरणा ते सफाळे स्थानकांदरम्यान  रोड ओव्हर पुलांचे  ५ गर्डर टाकण्यासाठी रविवारी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल आणि मेमू गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. 

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वैतरणा-साफळे स्थानकांदरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी पाच गर्डर्स टाकण्यात येणार आहेत. रविवारी सकाळी ८:५५  ते १०:५५ या वेळेत ट्रॅफिक कम पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान बोईसर-वसई रोड मेमू आणि दुपारी १२ वाजताची विरार -चर्चगेट लोकल रद्द असेल. डोंबिवली-बोईसर मेमू वसई रोड ते बोईसर,  डहाणू रोड-बोरिवली लोकल केवळे रोड ते बोरिवलीदरम्यान रद्द केली आहे.  चर्चगेट -डहाणू रोड लोकल केळवे रोड ते डहाणू रोडदरम्यान धावणार आहे.  डहाणू रोड-विरार लोकल केळवे रोड ते विरार दरम्यान रद्द केली आहे.  चर्चगेट -डहाणू रोड लोकल केळवे रोड ते डहाणू रोड दरम्यान धावणार आहे.

या गाड्यांवर लक्ष ठेवासुरत-विरार एक्स्प्रेस पालघर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.  विरार-वलसाड गाडी विरार ते पालघरदरम्यान रद्द केली आहे. याशिवाय  भगत की कोठी-वांद्रे टर्मिनस,  जोधपूर-वांद्रे टर्मिनस सूर्या नगरी एक्स्प्रेस,  भूज - वांद्रे टर्मिनस कच्छ एक्स्प्रेस, अहमदाबाद - मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस,  बिकानेर - दादर एक्स्प्रेस,  जामनगर - तिरुनेलवेली एक्स्प्रेस उशिरा धावणार आहे.

टॅग्स :मुंबईलोकल