Join us

एसटी अपघातानंतर पसार चालकाला अटक,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 4:36 AM

- चार तास वाहतुकीची कोंडीअपघातानंतर पसार एसटी चालकाला अटकमालाडमधील दुर्घटना : वाहकासह दोघे किरकोळ जखमीलोकमत न्यूज ...

- चार तास वाहतुकीची कोंडी

अपघातानंतर पसार एसटी चालकाला अटक

मालाडमधील दुर्घटना : वाहकासह दोघे किरकोळ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: भरधाव एसटी चालवल्याने कलंडलेली एसटी रस्त्यावर सोडून पळून गेलेल्या चालकाला कुरार पोलिसांनी अटक केली. तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या अपघातात वाहकासह दोघे किरकोळ जखमी झाले हाेते. तसेच वाहतूक कोंडीही झाली होती. याप्रकरणी पाेलिसांनी डी. एन. डहाळके या चालकाला अटक केली.

कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालाड पूर्वच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ओबेराॅय माॅलसमोरील ब्रिजजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास बस रूट क्र. ४८९ (एमएच २० बीएल ३०६२) ही चालकाने भरधाव वेगाने चालवल्याने कलंडली. त्यामुळे चालक तसेच फिर्यादी वाहक भास्कर कप्पे व एक प्रवासी किरकोळ जखमी झाले. नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान कलंडलेल्या एसटी बसमुळे जवळपास चार तास वाहतुकीची कोंडी झाली होती. कुरार व दिंडोशी पोलिसांच्या प्रयत्नामुळे बस मेट्रो क्रेनच्या सहाय्याने उभी करून रस्त्याच्या बाजूला लावण्यात आली. तसेच रस्त्यावर सांडलेले तेल अग्निशमन दलाच्या मदतीने साफ करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली

डहाळके याने अपघाताची माहिती पोलिसांना दिली नाही. जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता ताे घटनास्थळाहून पसार झाला हाेता. याप्रकरणी वाहक कप्पे यांनी कुरार पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार,कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने डहाळके याला मीरा रोड परिसरातून नुकतीच अटक केली.