Join us

ठाण्यात भरणार पासपोर्ट अदालत

By admin | Published: March 16, 2015 11:04 PM

तांत्रिक बाबींमुळे प्रलंबित राहिलेल्या अर्जदारांच्या पासपोर्टची प्रकरणे आता एकाच दिवसात मार्गी लावण्याचा अनोखा उपक्रम ठाणे पासपोर्ट कार्यालयाने हाती घेतला आहे.

ठाणे : काहींचे पुरावे सादर झालेले नसणे, काहींमध्ये त्रुटी असणे तसेच इतर काही तांत्रिक बाबींमुळे प्रलंबित राहिलेल्या अर्जदारांच्या पासपोर्टची प्रकरणे आता एकाच दिवसात मार्गी लावण्याचा अनोखा उपक्रम ठाणे पासपोर्ट कार्यालयाने हाती घेतला आहे. त्यानुसार, १८ मार्च रोजी पासपोर्ट अदालतीचे आयोजन केले आहे.सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही अदालत वरदान संकुल, रोड नंबर १६, एमआयडीसीसमोरील पासपोर्ट कार्यालयात सुरू राहणार असून ज्यांना वारंवार नोटिसा देऊनही त्यांनी अद्यापही पासपोर्ट घेतला नसेल, अशांना ही संधी देण्यात येणार आल्याची माहिती ठाणे पासपोर्ट कार्यालयाचे प्रमुख टी.डी. शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच दूरगामी जिल्ह्यातील लोकांना पासपोर्ट काढायचा झाल्यास त्यांना पासपोर्ट कार्यालयापर्यंत यावे लागत होते. परंतु, आता त्यांच्या वेळही वाचणार आहे. कारण, पासपोर्ट कार्यालयच आता अशा दुर्गम जिल्ह्याच्या ठिकाणी जाणार आहे. त्यानुसार, पहिला कॅम्प अलिबाग येथे २८ आणि २९ मार्च रोजी घेणार असून त्यानंतर मे, जूनमध्ये नंदुरबार, जळगाव, धुळे आणि विरारमध्ये हे कॅम्प होईल. तसेच सध्या सुरू असलेला पासपोर्ट मेळावा शनिवार, रविवारी वर्षभर सुरू राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यानुसार, नाशकात एक आणि ठाण्यात दोन असे हे मेळावे सुरू आहेत. पोलीस रिपोर्ट पोलीस रिपोर्ट ठाण्यात आॅनलाइन करण्यात आला आहे. रायगडमध्ये पुढील आठवड्यात, त्यानंतर महिना अखेरपर्यंत नवी मुंबई त्यानंतर नाशिक, नाशिक ग्रामीण आणि जळगावमध्येही ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच नंदुरबार आणि धुळे येथेही ही प्रणाली सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रणालीनुसार पोलिसांबरोबर पासपोर्टसाठी अर्ज करण्याचादेखील वेळ वाचणार आहे. विशेष म्हणजे शासनाच्या धोरणानुसार २१ दिवसांच्या आत एक आॅनलाइन रिपोर्ट पोलिसांनी सबमिट केला तर त्यांना एका अर्जदारानुसार १५० रुपये मिळत आहेत. परंतु, २१ दिवसांच्या पुढे गेल्यास केवळ ५० रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या कामालादेखील गती येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.