Join us

खड्डे शोधमोहीम बारगळणार

By admin | Published: February 14, 2016 2:56 AM

मुंबईतील खड्डे शोधून ४८ तासांमध्ये बुजविण्याची हमी देणारे महापालिकेचे संकेतस्थळ बंद पडले आहे़ खड्डे दाखवा, खड्डे बुजवा ही मोहीम गेली पाच वर्षे यशस्वी करणाऱ्या सॉफ्टवेअरचा

मुंबई : मुंबईतील खड्डे शोधून ४८ तासांमध्ये बुजविण्याची हमी देणारे महापालिकेचे संकेतस्थळ बंद पडले आहे़ खड्डे दाखवा, खड्डे बुजवा ही मोहीम गेली पाच वर्षे यशस्वी करणाऱ्या सॉफ्टवेअरचा कालावधी संपुष्टात आला आहे़ परिणामी, घोटाळ्यामुळे वादात सापडलेल्या रस्ते विभागातील उरलासुरलेला पारदर्शक कारभारही आता धोक्यात आला आहे़ मुंबईतील रस्ते दरवर्षी खड्ड्यात जात असल्याने पालिकेने २०११ मध्ये अशा प्रकारचे पहिले संकेतस्थळ तयार केले़ विशेष म्हणजे नागरिक स्वत: आपल्या वॉर्डातील खड्डयाचे छायाचित्र काढून या संकेतस्थळावर टाकू शकत असल्याने यास अल्पावधीच मोठा प्रतिसाद मिळाला़ केवळ खड्डयांचे छायाचित्र टाकण्यापुरतीच नव्हे तर अभियंता ४८ तासांमध्ये त्यावर कार्यवाही करीत आहे का, यावर या संकेतस्थळाद्वारे नजर ठेवणे शक्य होत होते़या सॉफ्टवेअरसाठी प्रोबेटी प्रा़लि़ या कंपनीबरोबर केलेला करार सप्टेंबर २०१५ मध्ये संपला़ यास पालिकेने दोन वेळा दोन महिन्यांची मुदतवाढ दिली़ त्यानंतर अशा सेवेसाठी निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली़ मात्र परत याच एका कंपनीची निविदा पालिकेपुढे आली़ कोणीही स्पर्धक नसल्यामुळे याच कंपनीला पुन्हा कंत्राट द्यायचे झाल्यास आयुक्तांच्या अधिकारातच ही नियुक्त करणे शक्य आहे़ महिन्याभराची प्रतीक्षापावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात़ हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला युद्ध पातळीवर काम सुरू करावे लागते़ अशा वेळी वॉर्डावॉर्डातील खड्डे शोधण्यासाठी नागरिकांकडून आलेल्या तक्रारी मदत करीत असतात़ मात्र हे संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्यासाठी पालिकेला आणखी महिन्याभराचा कालावधी लागेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़संकेतस्थळासाठी न्यायालयाचे आदेशआपल्या वॉर्डातील खड्डयांची तक्रार करण्यासाठी नागरिकांना एसएमएस, संकेतस्थळ अथवा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला दिले आहेत़ त्यामुळे असे संकेतस्थळ सुरु करणे पालिकेला क्रमप्राप्त आहे़ (प्रतिनिधी)मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मोहिमेला भूमिगत केबल्स वाहिन्या असलेल्या सेवा कंपन्यांनी हरताळ फासला आहे़ कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते खोदून या कंपन्या पालिकेला आर्थिक खड्ड्यात घालत असल्याचे समोर आले आहे़ किंग्ज सर्कल येथे १ कोटी रुपये खर्च करून तयार झालेला मुख्य रस्ता फोरजी केबल्स टाकण्यासाठी खोदण्यात आला आहे.दरवर्षी सुमारे ४०० कि़मी़हून जास्त रस्ते खोदले जातात़ यामुळे रस्ते खड्ड्यात जात असल्याने पालिकेने डक्टिंग पद्धत आणली़ त्यानुसार रस्त्याच्या एका बाजूला टाकलेल्या भूमिगत केबल्स संबंधित कंपनीला दुरुस्तीच्या वेळी काढणे शक्य होत़े असे डक्ट असतानाही ठेकेदारांनी येथील एडेनवाला रोड आणि कूलर रेस्टॉरंटसमोरचे पदपथ खोदले आहेत़ ठेकेदाराने सांगितले की, पालिकेकडून केवळ पदपथ खोदण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील खोदकाम बेकायदेशीर असल्याचे उघड झाले आहे़ चर बुजविण्याचे कामही अर्धवट झाले आहे. हा रस्ता गेल्या वर्षीच दुरुस्त करण्यात आला आहे़