कोरोनामुळे डिजिटल लोकशाहीकडे मार्गक्रमण; सहिष्णुता वाढली, व्यवसाय वृद्धीसाठी नव्या प्रणालीचा स्वीकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 12:45 PM2020-10-21T12:45:30+5:302020-10-21T12:45:37+5:30

मुंबई : कोरोना संकटामुळे केवळ डिजिटल अर्थव्यवस्थाच बळकट होत नसून मानवी कार्यपद्धती बदल होत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. ...

path to digital democracy due to Corona Tolerance increased adoption of new system for business growth | कोरोनामुळे डिजिटल लोकशाहीकडे मार्गक्रमण; सहिष्णुता वाढली, व्यवसाय वृद्धीसाठी नव्या प्रणालीचा स्वीकार

कोरोनामुळे डिजिटल लोकशाहीकडे मार्गक्रमण; सहिष्णुता वाढली, व्यवसाय वृद्धीसाठी नव्या प्रणालीचा स्वीकार

Next


मुंबई : कोरोना संकटामुळे केवळ डिजिटल अर्थव्यवस्थाच बळकट होत नसून मानवी कार्यपद्धती बदल होत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. दूरस्थ कामामुळे लोकांची सहिष्णुता वाढली आहे. सामाजिक वीणही त्यामुळे बदलत आहे. व्यवसाय वृद्धीसाठी नवी कार्यशैली स्वीकारली जात आहे. आरोग्य सेवांचेही डिजिटलायझेशन झाले असून विविध क्षेत्रातील ऑटोमेशनने वेग धरला आहे. त्यातून आपले ‘डिजिटल लोकशाही’कडे मार्गक्रमण होत आहे. 

काॅन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि फ्यूचर फॅक्टरी या संस्थांनी ‘शेप ऑफ दी फ्यूचर’ हा आपला सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रसिध्द केला आहे.  त्यात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. केवळ अर्थव्यवस्थेतील बदल या अहवालाने टिपले नसून भविष्यातील व्यवसायांची वाटचाल कशी असेल याबाबतही मार्गदर्शन केले आहे.  डिजिटल व्यवहारांना आता ग्राहकांच्या आर्थिक श्रेणीचे बंधन राहिले नसून ते सर्वदूर केले जात आहेत. त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन गरजांवर आणि समाजावरही होणार असल्याचे मत फ्यूचर फॅक्टरीच्या बिहेवियरल रिसर्च केंद्राच्या प्रमुख गीतिका कांबळी यांनी व्यक्त केले आहे. 

तर, उद्योग क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण आणि नवी आव्हाने असतानाही त्यांचा स्वीकार उद्योगक्षेत्राकडून होत असल्याचे मत सीआयआयच्या पश्चिम क्षेत्र इनोव्हेशन समितीचे अध्यक्ष राजेंद्र नवानी यांनी सांगितले.
  
कोरोना संक्रमणामुळे आरोग्य क्षेत्रात कमालीचे बदल झाले असून डिजिटल माध्यमांच्या मदतीने रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावरील उपचार हे त्यांच्या सबलीकरणाची साक्ष देत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ऑटोमेशनमुळे छोट्या व्यावसायिकांच्या कार्यपध्दतीत मोठा बदल झाला असून एक प्रकारे त्यांचे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन झाले आहे. आपण कशा पध्दतीने खरेदी करतो, प्रवास कसा करतो, काय खातो , कसे खातो यातले बदल हे व्यवसायांची इकोसिस्टीम बदलणारी असल्याचेही हा अहवाल सांगतो.

ग्राहकांच्या वतर्वणुकीचाही मागोवा
काॅन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) आणि फ्यूचर फॅक्टरी या संस्थांनी ‘शेप ऑफ दी फ्यूचर’ हा आपला सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रसिध्द केला आहे.  त्यात हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. केवळ अर्थव्यवस्थेतील बदल या अहवालाने टिपले नसून भविष्यातील व्यवसायांची वाटचाल कशी असेल याबाबतही मार्गदर्शन केले आहे. ग्राहकांची वर्तणूक कशा पध्दतीने बदलत आहे याचा मागोवा घेण्यात आला आहे.

Web Title: path to digital democracy due to Corona Tolerance increased adoption of new system for business growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.