Join us  

पालिकेवर पथदिव्यांचा भार

By admin | Published: January 04, 2015 1:10 AM

मुंबईतील एक लाख ३२ हजार पथदिवे बदलून नवीन जास्त प्रकाशक्षमतेचे दिवे बसविण्याचा प्रकल्प केंद्र सरकारने जाहीर केला आहे़

मुंबई : मुंबईतील एक लाख ३२ हजार पथदिवे बदलून नवीन जास्त प्रकाशक्षमतेचे दिवे बसविण्याचा प्रकल्प केंद्र सरकारने जाहीर केला आहे़ यामुळे पालिकेच्या १६४ कोटी वार्षिक वीज बिलामध्ये ५० टक्के तसेच १० कोटी युनिटची बचत होणार आहे़ या प्रकल्पातून सर्वप्रथम मरिन ड्राइव्हचा क्विन्स नेकलेस लकाकणार आहे़ मात्र या प्रकल्पाचा अडीचशे कोटी रुपयांचा भार पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे़ऊर्जा बचतीच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला़ केंद्रातील एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) कंपनीमार्फत हे दिवे बदलण्यात येणार आहेत़ दसऱ्यापूर्वी संपूर्ण मुंबई एलईडी दिव्यांनी उजळून निघेल, अशी माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड़ आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून दिली़ या प्रकल्पाचे उद्घाटन ३१ जानेवारी रोजी मरिन ड्राइव्ह येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे़ त्यानंतर वांद्रे, मुलुंड आणि कुलाबा येथील पथदिवे बदलले जाणार आहेत़ हे दिवे बदलल्यानंतर वीजबिलामध्ये झालेल्या ५० टक्के बचतीतून अडीचशे कोटींची परतफेड पालिकेला करत येणार आहे़ ईईएसएल ही कंपनी पालिकेशी करार करून सात वर्षे या पथदिव्यांची देखभाल करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले़ (प्रतिनिधी) एलईडी दिवे लावण्याचा प्रकल्प केंद्राच्या पुढाकाराने होत असल्याचा दावा अ‍ॅड़ शेलार यांनी केला़ मात्र या प्रकल्पासाठी येणारा अडीचशे कोटींचा खर्च पालिकेलाच उचलावा लागणार आहे़ टप्प्याटप्प्याने हे पैसे पालिका परत करणार आहे़ मात्र १६४ कोटींच्या वीजबिलांमध्ये ५० टक्के बचत झालेली रक्कम पालिका सहा महिन्यांत परतफेड करू शकेल, असा दावा भाजपाने केला आहे़एलईडी दिवे लावण्याचा प्रकल्प केंद्राच्या पुढाकाराने होत असल्याचा दावा अ‍ॅड़ शेलार यांनी केला़ मात्र या प्रकल्पासाठी येणारा अडीचशे कोटींचा खर्च पालिकेलाच उचलावा लागणार आहे़ टप्प्याटप्प्याने हे पैसे पालिका परत करणार आहे़ मात्र १६४ कोटींच्या वीजबिलांमध्ये ५० टक्के बचत झालेली रक्कम पालिका सहा महिन्यांत परतफेड करू शकेल, असा दावा भाजपाने केला आहे़पालिकेला वेठीस धरून प्रकल्पस्थायी समिती, सभागृहाला माहिती न देता थेट केंद्राच्या कंपनीला नियुक्त करणे म्हणजे सभागृहाची थट्टाच असल्याचा संताप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी व्यक्त केला़ या नियमबाह्य प्रस्तावाला काँग्रेस पक्ष विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले़ मुंबईतील रस्त्यांवर एक लाख ३२ हजार ४५८ पथदिवे आहेत़ यामध्ये बेस्टचे ३९ हजार ६०३, रिलायन्सचे ८० हजार २०९ आणि एमईसीबीच्या १२ हजार ६५२ दिव्यांचा समावेश आहे़ दरवर्षी २० कोटी युनिट वीज जळते़ त्यापोटी १६४ कोटी रुपये पालिकेला बिल भरावे लागत आहे़ नवीन दिव्यांमुळे १० कोटी युनिट विजेची बचत होईल, असा दावा शेलार यांनी केला आहे़