पॅथॉलॉजिस्टची ‘चाचणी’ होणार

By admin | Published: July 23, 2015 02:14 AM2015-07-23T02:14:47+5:302015-07-23T02:14:47+5:30

पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट नसताना तपासण्या करणे, तपासणी अहवालावर स्कॅन केलेली सही देणे,

Pathologist's 'test' will be done | पॅथॉलॉजिस्टची ‘चाचणी’ होणार

पॅथॉलॉजिस्टची ‘चाचणी’ होणार

Next

मुंबई : पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट नसताना तपासण्या करणे, तपासणी अहवालावर स्कॅन केलेली सही देणे, असे अनेक अनधिकृत प्रकार सुरू असतात. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने पॅथॉलॉजिस्टबाबत त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींवर अखेर ८ आॅगस्ट रोजी सुनावणी ठेवली आहे.
मुंबईत पॅथॉलॉजी लॅबमध्ये होणारे गैरव्यवहार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून समोर आणले होते. त्याचबरोबरीने महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अजूनही पॅथॉलॉजिस्टवर कारवाई करीत नसल्याचेही तेव्हा समोर आले होते. त्यावेळी परिषदेने काही तक्रारींचे निवारण लवकरात लवकर करून पॅथॉलॉजिस्टवरची सुनावणी घेऊ, असेही सांगितले होते. यानंतर आता पहिल्यांदाच बोगस पॅथॉलॉजिस्टची सुनावणी परिषदेकडे होणार आहे.
पॅथॉलॉजी लॅबमध्ये होणाऱ्या तपासण्यांचा अहवाल देताना तिथे पॅथॉलॉजिस्ट असणे गरजेचे असते. तपासणी अहवाल तपासून मगच त्यावर पॅथॉलॉजिस्टनी सही करणे कायदासंमत आहे. असा नियम असूनही याचे अनेक ठिकाणी पालन होताना दिसत नाही. एकाच पॅथॉलॉजिस्टच्या नावाने वेगवेगळ््या १० ते १५ ठिकाणी अहवाल दिले जातात. तर काही डॉक्टर हे रक्त तपासणीसाठी बोगस पॅथॉलॉजी लॅबमध्ये जाण्याचा रुग्णांना सल्ला देतात. याबाबत महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेने परिषदेकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. परिषदेने हेच मुद्दे लक्षात घेऊन ८ आॅगस्ट रोजी सुनावणीसाठी पॅथॉलॉजिस्टना नोटिसा पाठवल्या आहेत. एकूण किती पॅथॉलॉजिस्टना नोटीस पाठवल्या आहेत, याचा आकडा मात्र परिषदेने सांगितला नाही.

Web Title: Pathologist's 'test' will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.