रुग्ण दुप्पट होण्याचा काळ एक वर्षावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:16 AM2021-01-08T04:16:27+5:302021-01-08T04:16:27+5:30

मुंबई : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून ३० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड ...

Patient doubling period to one year | रुग्ण दुप्पट होण्याचा काळ एक वर्षावर

रुग्ण दुप्पट होण्याचा काळ एक वर्षावर

Next

मुंबई : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून ३० डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहर उपनगरात दिवसभरात ४०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी एक वर्षावर पोहोचला असून सध्या ७ हजार ४८० रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत दिवसभरात ७९५ रुग्ण आणि ८ मृत्यूंची नोंद झाली आहे. शहर उपनगरात कोरोनाबाधितांंची एकूण संख्या २ लाख ९६ हजार ३१९ असून मृतांचा आकडा ११ हजार १५५ झाला आहे. मृत्यू झालेल्या ८ रुग्णांपैकी सात रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, त्यात ६ रुग्ण पुरुष व २ रुग्ण महिला होत्या. शहर उपनगरात कोरोनाच्या आतापर्यंत २४ लाख ३० हजार ९७२ चाचण्या झाल्या आहेत.

शहर उपनगरात चाळ व झोपडपट्टीच्या परिसरात सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या १९५ असून सक्रिय सीलबंद इमारती १ हजार ९८४ आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २ हजार ५३८ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

Web Title: Patient doubling period to one year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.