रुग्णांना आता मिळणार ‘हेल्थकार्ड’, पाच रुग्णालयांत प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 03:05 AM2018-03-23T03:05:59+5:302018-03-23T03:05:59+5:30

रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची नोंद राहावी, भविष्यातील औषधोपचारांच्या दृष्टीने वर्षानुवर्षे ही नोंद कायम राखावी यासाठी आता पालिका रुग्णालयांतर्फे रुग्णांना ‘हेल्थकार्ड’ देण्यात येणार आहे. याकरिता मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णालय व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे.

 Patients will now get a 'Health Card', starting with five experimental therapies | रुग्णांना आता मिळणार ‘हेल्थकार्ड’, पाच रुग्णालयांत प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

रुग्णांना आता मिळणार ‘हेल्थकार्ड’, पाच रुग्णालयांत प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

googlenewsNext

मुंबई : रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची नोंद राहावी, भविष्यातील औषधोपचारांच्या दृष्टीने वर्षानुवर्षे ही नोंद कायम राखावी यासाठी आता पालिका रुग्णालयांतर्फे रुग्णांना ‘हेल्थकार्ड’ देण्यात येणार आहे. याकरिता मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये रुग्णालय व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात हेल्थकार्डच्या माध्यमातून एका बारकोडच्या साहाय्याने रुग्णांची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
रुग्णालयीन व्यवस्थापन प्रणालीचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. मात्र आता पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून त्याचे परिपूर्ण सादरीकरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून नायर, कस्तुरबा, राजावाडी, कूपर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय या पाच रुग्णालयांत प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली कार्यरत होणार आहे.
केईएम रुग्णालयातील रुग्णांची संख्या पाहता, पहिल्यांदा नायर रुग्णालयात या प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. त्याकरिता सध्या पालिका दवाखान्यांत या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.
शहर-उपनगरातील जवळपास ९ हजार ३६० रुग्णांना या पद्धतीचे ‘हेल्थकार्ड’ वितरित करण्यात आले आहे. नव्या ‘हेल्थकार्ड’च्या माध्यमातून टोकन क्रमांकानुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत.

‘हेल्थकार्ड’विषयी
या हेल्थकार्डवर रुग्णाचे नाव, पत्ता, वय, रक्तगट आणि वैयक्तिक माहिती असेल. याशिवाय, रुग्णावर केले जाणारे उपचार, वैद्यकीय चाचणी, त्यांचे अहवाल याची संपूर्ण माहिती या प्रणालीत असेल. रुग्णाला कागदपत्रांचे गठ्ठे, खूप साºया फायली एकत्र घेऊन फिरावे लागणार नाही.
तसेच, हे हेल्थकार्ड आधारकार्डशी लिंक करण्यात येणार असून दोन्ही पद्धतींच्या माहितीची सांगड घातली जाईल, हेल्थकार्ड जवळ बाळगल्यास रुग्णांवर उपचार करणे सोपे होईल.

Web Title:  Patients will now get a 'Health Card', starting with five experimental therapies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.