महापौरपदी शिवसेनेच्या अपेक्षा पाटील
By Admin | Published: October 5, 2014 02:22 AM2014-10-05T02:22:29+5:302014-10-05T02:22:29+5:30
महापौर आणि उपमहापौर पदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत महापौरपदी शिवसेनेच्या अपेक्षा पाटील यांची तर उपमहापौरपदी रिपाइंच्या पंचशीला पवार यांची निवड झाली आहे.
>उल्हासनगर : महापौर आणि उपमहापौर पदासाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत महापौरपदी शिवसेनेच्या अपेक्षा पाटील यांची तर उपमहापौरपदी रिपाइंच्या पंचशीला पवार यांची निवड झाली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीत फूट पडली असली तरीही उल्हासनगर महापालिकेत मात्र महायुती कायम ठेवण्यात नेत्यांना यश आले आहे.
अपेक्षा पाटील यांनी साई पक्षाच्या इंदिरा इदासी यांचा 38 विरुद्ध 32 मतांनी तर पंचशीला पवार यांनी काँग्रेसच्या राजेश वधारिया यांचा 37 विरुद्ध 33 मतांनी पराभव केला. शिवसेनेने 4 अपक्ष नगरसेवकांना सोबत घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि साई पक्षाचे प्रत्येकी दोन नगरसेवक फोडल्याने शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकला. रिपाइंचे नगरसेवक भगवान भालेराव यांनी उपमहापौर निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता बंडखोरी करून आघाडीच्या राजेश वधारिया यांना मतदान केले.
शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी राजकीय खेळी करून काँग्रेसच्या नगरसेविका जया साधवानी, मीना सोंडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक जाफरअली चौधरी, राजू कंडारे, साई पक्षाचे अंकुश म्हस्के, अनिता तरे हे 6 नगरसेवक फोडले आणि महापालिकेवरील महायुतीची सत्ता कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजाविली़ महापौरपदासाठी 7 तर उपमहापौरपदासाठी 8 अर्ज दाखल झाले होत़े
गेल्या निवडणुकीत उल्हासनगर महापालिकेच्या सत्तेपासून पप्पू कलानी यांना दूर ठेवण्यासाठी साई पक्षाने महायुतीला पाठिंबा देऊन महापौरपद मिळविले होते. मात्र, महायुतीच्या अंतर्गत करारनाम्यानुसार सव्वा वर्षानंतर साई पक्षाने महापौरपद सोडण्यास नकार दिल्याने पालिकेत महापौर राजीनामानाटय़ घडले. या प्रकारात संतप्त शिवसैनिकांनी महापौर आशा इदनानी यांच्यासह साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी, आमदार कुमार आयलानी, उपमहापौर जमनुदास पुरस्वानी यांच्यासह पक्षाच्या नगरसेवकांना धक्काबुक्की, मारहाण करून महापौर कार्यालयाची तोडफोड केली होती. अपमानास्पद वागणूक मिळाल्याने साई पक्षाने या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा करून महापौरपद मागितल़े त्याबदल्यात साई पक्षाने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांना समर्थन दिले होते.
काँग्रेस व साई पक्षाने व्हीप जाहीर करूनही पक्षाच्या जया साधवानी, मीना सोंडे, अंकुश म्हस्के, अनिता तरे तर राष्ट्रवादीचे जाफरअली चौधरी, राजू कंडारे गैरहजर राहिले. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नेत्यांनी दिली. रिपाइंचे भगवान भालेराव यांनी पक्षाच्या उपमहापौरपदाच्या उमेदवार पंचशीला पवार यांच्याविरोधात मतदान केल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
च्महापौरपदाच्या शर्यतीतून शिवसेनेच्या नेहा भोईर, समिधा कोरडे, राष्ट्रवादीच्या मीनू दासानी, डॉ़ नीना नाथानी यांनी माघार घेतली. शिवसेनेच्या अपेक्षा पाटील व साई पक्षाच्या इंदिरा इदासी यांच्यात सरळ लढत झाली. पाटील यांनी उदासी यांचा 38 विरुद्ध 32 मतांनी पराभव केला़
च्उपमहापौरपदाच्या शर्यतीत रिपाइंच्या पंचशीला
पवार, भगवान भालेराव, साई पक्षाचे विजय तायडे, शिवसेनेचे सुभाष मनसुलकर, राष्ट्रवादीचे राजू
जग्यासी, नरेंद्र ठाकूर व काँग्रेसचे राजेश वधारिया
असे आठ जण होते. यापैकी सुभाष मनसुलकर यांनी अर्ज मागे घेतला.
उपमहापौरांना 37 मते
उपमहापौर शर्यतीत होत़े मात्र, अंतिम लढतीत रिपाइंच्या पंचशीला पवार यांनी काँग्रेसच्या राजेश वधारिया यांचा 37 विरोधात 33 मतांनी पराभव केला़ इतर उमेदवारांना शून्य मतदान झाल़े