पुरस्कार उशिरा मिळाल्याची पाटील यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:42 AM2018-12-06T05:42:09+5:302018-12-06T05:42:14+5:30

वयाच्या ८८व्या वर्षी हा पुरस्कार जाहीर झाल्याने या सन्मानासाठी काहीसा उशीर झाल्याची सलही मनात आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांनी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

Patil received the award late | पुरस्कार उशिरा मिळाल्याची पाटील यांची खंत

पुरस्कार उशिरा मिळाल्याची पाटील यांची खंत

googlenewsNext

मुंबई : वयाच्या ८८व्या वर्षी हा पुरस्कार जाहीर झाल्याने या सन्मानासाठी काहीसा उशीर झाल्याची सलही मनात आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांनी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
पाटील यांना मराठी भाषा विभागात, तर कोकणी भाषा विभागात कवी परेश नरेंद्र कामत यांना २०१८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आला. तसेच अभिजात वाङ्मय आणि संशोधनपर लिखाणासाठी मराठी लेखिका डॉ. शैलजा बापट यांना ‘भाषा सन्मान’ पुरस्कार जाहीर
झाला.
‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध (वाङ्मयीन समीक्षा)' ग्रंथासाठी म. सु. पाटील यांना, तर ‘चित्रलिपी' या काव्यसंग्रहासाठी परेश कामत यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच डॉ. शैलजा बापट यांनी ‘ए क्रिटिकल स्टडी आॅफ ब्रह्मसूत्राज’ हा तीन खंडांतील संशोधनपर ग्रंथ व शुद्ध अद्वैत, केवल अद्वैत वेदांतावरही पुस्तके लिहिली आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे त्यांची ‘प्रोफेसर एमिरेट्स’ म्हणून निवड करण्यात आली होती.
पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या त्या कार्यकारिणी सदस्य आहेत.
>सध्याचे लिखाण कालानुरूप आहे का?
साहित्य क्षेत्रात सध्या होणारे लिखाण काळानुरूप आहे का, याचा विचार करणे गरजेचे आहे, अजूनही साहित्यातील लिखाण साठीच्या दशकातील आहे. ते वाचून समाधानाची भावना निर्माण होत नाही. साहित्यातील लिखाणात केवळ बुद्धिनिष्ठतेचे प्रतिबिंब दिसून येते आहे. माणसा-माणसांतही संवाद हरपल्याने अनुभव कमी पडतोय, त्यामुळे लिखाणही ताकदीचे होत नसल्याची जाणीव प्रकर्षाने होत असल्याचे पाटील म्हणाले.

Web Title: Patil received the award late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.