Join us

पाटील यांना दुुसऱ्यांदा समन्स बजावणार

By admin | Published: May 24, 2016 3:25 AM

सीएसटी स्थानकात तब्बल एक तास देवगिरी एक्सप्रेस रोखून ठेवल्याप्रकरणी एक समन्स पाठविल्यानंतरही त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा

मुंबई : सीएसटी स्थानकात तब्बल एक तास देवगिरी एक्सप्रेस रोखून ठेवल्याप्रकरणी एक समन्स पाठविल्यानंतरही त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात येणार आहे. वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी ही माहिती दिली. शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी १३ एप्रिल रोजी रात्री सीएसटी स्थानकात तब्बल एक तास देवगिरी एक्सप्रेस रोखली होती. एका बाजूला शयन आसन मिळाल्याने त्याविरोधात पाटील यांनी आंदोलन करत तासभर ट्रेन रोखून धरली. मात्र डब्यात असलेली अस्वच्छता, उंदरांचा वावर आणि आमदारांना सोडून दलालांच्या अन्य माणसांचा भरणा डब्यात असल्याने आपण आंदोलन केले, असे ते म्हणाले होते. ट्रेन रोखून कामात अडथळा आणल्याबद्दल आरपीएफने त्वरित ‘अज्ञात’ इसमाविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेच्या सविस्तर चौकशीसाठी आमदार पाटील यांना बोलावले होते, परंतु समन्स बजावूनही ते उपस्थित राहिले नाहीत.