प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार- पाटील

By admin | Published: March 27, 2017 06:25 AM2017-03-27T06:25:40+5:302017-03-27T06:25:40+5:30

पन्नास वर्षांपासून रखडलेले कोयना पूनर्वसन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ्विधानपरिषद अधिवेशनात उपस्थित करून मार्गी

Patil will solve the problems of project-affected people- Patil | प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार- पाटील

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावणार- पाटील

Next

वावोशी : पन्नास वर्षांपासून रखडलेले कोयना पूनर्वसन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न ्विधानपरिषद अधिवेशनात उपस्थित करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, असे निवेदन संघटनेच्या वतीने आमदार बाळाराम पाटील यांना देण्यात आले. याबाबतचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन आ. पाटील यांनी संघटनेच्या सदस्यांना दिले आहे.
या वेळी पूनर्वसन प्रकल्पग्रस्त संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष पवन कदम, उपाध्यक्ष उमेश कदम, अर्जुन कदम आदी उपस्थित होते. कोयना पूनर्वसन प्रकल्पग्रस्त वसाहतींना नागरी सुविधा पुरविणे, त्यांना पर्यायी जमीन देणे, महसूल दर्जा देणे अशा अनेक समस्या गेल्या ५० वर्षांपासून भेडसावत आहेत. कोयनाबाधित अजूनही दुर्लक्षित आहेत. आमदार बाळाराम पाटील यांची कोयना प्रकल्पग्रस्तांंनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन लेखी निवेदन देऊन कोयना प्रकल्पग्रस्तांनी या विषयाबाबत सविस्तर चर्चा केली. चालू अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Patil will solve the problems of project-affected people- Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.