Join us

पाटणकर प्रकरणातील धर्मराज काळोखेची जामिनावर सुटका

By admin | Published: December 15, 2015 2:01 AM

ड्रग माफिया शशिकला उर्फ बेबी पाटणकर यांच्या ड्रग विकण्याच्या व्यवसायात भागीदार असल्याचा आरोप असलेल्या हवालदार धर्मराज काळोखेची सोमवारी सातारा येथील विशेष

मुंबई : ड्रग माफिया शशिकला उर्फ बेबी पाटणकर यांच्या ड्रग विकण्याच्या व्यवसायात भागीदार असल्याचा आरोप असलेल्या हवालदार धर्मराज काळोखेची सोमवारी सातारा येथील विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामिनावर सुटका केली. केमिकल अ‍ॅनालिसीसच्या अहवालात जप्त केलेले पदार्थ अंमली पदार्थ नसून, सोडियम ग्लुटामेट (अजिनोमोटो) असल्याचे उघडकीस आले आहे.काळोखेच्या सातारा येथील राहत्या घरातून ११२ किलो तर मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमधील त्यांच्या लॉकरमधून १२ किलो एम-कॅट जप्त करण्यात आले. या प्रकरणी ९ मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली. मात्र सातारा येथून जप्त केलेल्या पदार्थ अमली पदार्थ नसून सोडियम ग्लुटामेत असल्याचे पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबने केलेल्या चाचणीतून निष्पन्न झाले आहे. तसा अहवाल विशेष एनडीएपीएस न्यायालयात सादर करण्यात आल्याची माहिती काळोखेचे वकील जयेश वाणी यांनी दिली.