Join us

मोठी बातमी! संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 12:10 PM

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

मुंबई: पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत  यांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर १० ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. आताच्या घडीला संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात असून, हा मुक्काम वाढला आहे. 

संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून, यावरील सुनावणी विशेष पीएमएलए न्यायालयात सुरू आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे. 

Sanjay Raut: दिलासा नाहीच! संजय राऊतांचा दसराही कोठडीतच; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली 

 नेमकं प्रकरण काय आहे? 

ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक  केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाचा भूखंड असलेली पत्राचाळ विकसित करण्याचे काम प्रवीण संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. मात्र, प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीतील रहिवाशांची फसवणूक करून काही भूखंड खासगी विकासकाला विकला. 

म्हाडा व भाडेकरूंच्या तोंडाला पाने पुसत प्रवीण राऊत यांनी  भूखंडाचे अनेक भाग खासगी विकासकांना हस्तांतरित केले. तर स्वतःचे २५ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. ईडीच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारातील काही रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा झाली आहे.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनान्यायालय