Join us

वाहतूक पोलिसांच्या निर्णयाला ‘पॉज’चा आक्षेप, सहपोलीस आयुक्तांच्या आदेशावर हरकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 3:01 AM

बकरी ईदनिमित्त राज्य आणि राज्याबाहेरून जनावरांची वाहतूक करणाºया गाड्यांना अडवून नाहक त्रास देऊ नये, असे आदेश सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत.

मुंबई : बकरी ईदनिमित्त राज्य आणि राज्याबाहेरून जनावरांची वाहतूक करणाºया गाड्यांना अडवून नाहक त्रास देऊ नये, असे आदेश सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक पोलिसांना दिले आहेत. मात्र, या आदेशावर हरकत व्यक्त करत, पोलीस आपल्या कर्तव्यापासून दूर पळत असल्याचा आरोप, प्लान्ट अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीने (पॉज) केला आहे.ईदच्या पार्श्वभूमीवर बकरी आणि लहान-मोठी जनावरे मुंबईत विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल होतात. वाहतूक पोलिसांकडून जनावरे वाहून नेणाºया वाहनांना अडवून विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप व्यापारी वर्गाने केला होता. त्याची दखल घेत, वाहतूक पोलीस विभागाने ईदनिमित्त बकºया आणि जनावरांची वाहतूक करणाºया कोणत्याही वाहनांची अथवा कागदपत्रांची तपासणी करू नये, असे आदेश देण्यात आले. मात्र, वाहनांची तपासणी झाली नाही, तर एकाच गाडीत प्रमाणाहून अधिक जनावरांची वाहतूक करताना, कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे, पॉजचे सचिव सुनिश कुंजू यांचे म्हणणे आहे.कुंजू म्हणाले की, बकरी ईदच्या काळात पोलिसांनी अधिक सतर्कतेने काम करायला हवे. पशू वाहतूक नियमांचे, प्राण्यांवरील अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यांचे पालन करण्याचे काम सोडून, पोलीस जनावरांच्या वाहनांची तपासणी न करण्याचे आदेश देत आहेत, हे अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने दिलेले आदेश मागे घ्यावेत, या मागणीसाठी पॉजकडून पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक, गृहमंत्री आणि धर्मादाय आयुक्तांना पत्राद्वारे मागणी करणार असल्याचे सांगण्यातआले.वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त जनावरे शहरात आणण्याची शक्यता आहे.वन्य प्राण्यांची तस्करी केली जाऊ शकते.खाण्यासाठी किंवा ज्या प्राण्यांना मारण्याची परवानगी नाही, अशा प्राण्यांची कत्तल होऊ शकते.गोमांसाची तस्करी होऊ शकते.दहशतवादी संघटना याचा गैरफायदा घेऊ शकतात.रोग झालेल्या अथवा आजारी जनावरांचे मांस विकले जाईल, ज्यामुळे कित्येक मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात येईल.

 

टॅग्स :पोलिस