Join us

पावणेदोन लाख बुडवून ठार मारण्याची धमकी

By admin | Published: March 23, 2015 1:08 AM

चरईतील डॉ. राजश्री माने आणि विश्वास देशपांडे यांनी पूनम मोरे यांच्या मून स्टोन कॉन्सेप्ट्स संस्थेला नवीन प्रकल्पाच्या जाहिरातींचे काम दिले होते.

ठाणे : चरईतील डॉ. राजश्री माने आणि विश्वास देशपांडे यांनी पूनम मोरे यांच्या मून स्टोन कॉन्सेप्ट्स संस्थेला नवीन प्रकल्पाच्या जाहिरातींचे काम दिले होते. या कामाची बिले आणि इतर खर्च मिळून एकूण एक लाख ८१ हजार ८३९ रुपयांची मागणी करूनही त्यांनी ते दिले नाहीत. शिवाय पैसे मागितले म्हणून माने हिचा मित्र अजित याने त्यांना रिव्हॉल्व्हर दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पूनम यांना ‘टू स्टेप्स अहेड’ या जाहिरातींचे काम देण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी डॉ. माने आणि देशपांडे यांच्याकडे खर्चासह जाहिरातींच्या बिलांची मागणी केली होती. ते देण्याऐवजी त्यांना कार्यालयात बोलवले. तिथे प्रियंका वानखेडे आणि अजित उपस्थित होते. प्रकल्पाचा प्रस्ताव हा डॉ. माने आणि देशपांडे यांच्याशी झालेला असताना तिथे इतर दोघांची उपस्थिती कशासाठी, असा सवाल पूनम यांनी केल्यानंतर त्यांना अर्वाच्य भाषेत उत्तरे देण्यात आली. अजित याने तर रिव्हॉल्व्हर काढून पुन्हा पैसे मागाल तर बघा, असे धमकावून ठार मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार नौपाड्यातील ‘पनामा प्लॅनेट’मध्ये २७ जून २०१४ रोजी घडला. त्यांनी न्यायालयात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. २० मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)