Join us

अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा; मराठा आरक्षणाशिवाय पार पडणार प्रवेश प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 2:58 PM

राज्य सरकारच्या आदेशानुसार , एसईबीसी आरक्षणाशिवाय ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. 

मुंबई: रखडलेली अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार , एसईबीसी आरक्षणाशिवाय ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.  एसईबीसी वर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना वर्ग बदलण्याची संधी, दुसरी गुणवत्ता यादी ५ डिसेंबर रोजी जाहीर होऊन ९ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहेत.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्या होती. त्यानंतर मराठा आरक्षणचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये अशी मागणी, मराठा वर्गाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच यासंदर्भातील जीआरही राज्य सरकारने जारी केला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने एकीकडे याचिका केली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया रखडलेली होती. अशातच आता विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आणखी न रखडवता सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

टॅग्स :मराठा आरक्षणमहाराष्ट्र सरकार