क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या ‘प्रोत्साहन भत्त्या’चा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 04:22 AM2020-08-27T04:22:02+5:302020-08-27T04:22:07+5:30
४७० जणांना मिळणार लाभ; लवकरच होणार अंमलबजावणी
मुंबई : कोरोनाच्या जीवघेण्या आजाराचा विळखा घट्ट होत असतानाही जीव धोक्यात घालत सेवा बजावणाºया मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर संघाचे अध्यक्ष संदीप खरात, कार्याध्यक्ष नरेंद्र आंब्रे तसेच कोषाध्यक्ष निखिल गांधी यांनी कर्मचाºयांच्या हक्कासाठी मात्र सतत लढा सुरू ठेवला. तर ‘लोकमत’ने त्यांची व्यथा मांडत याचा पाठपुरावा केला. अखेर प्रशासनाने त्यांची दखल घेत प्रोत्साहन भत्त्याची बाब मंजूर केली. याचा लाभ जवळपास ४७० कर्मचाºयांना होणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. पालिकेच्या कर्मचाºयांप्रमाणेच मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेचे कर्मचारी कोरोना काळात स्वत:सह कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता टीबीच्या रुग्णाची सेवासुश्रुषा करत आहेत. त्यासाठी त्यांना पालिकेकडून प्रोत्साहन भत्ता दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र जवळपास तीन वेळा याबाबतची फाईल नाकारण्यात आली. यामुळे कर्मचाºयांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबतची कागदोपत्री प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची सही त्यावर झाल्याने या कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कारण महिनाभरात सर्व संबंधिताना त्याचा लाभ मिळणार आहे.
सदर बाबींचा पाठपुरावा एप्रिल ते आॅगस्ट महिन्यापर्यंत केला. भत्त्याबाबत मान्यता घेण्यात आली व ज्या प्रशासन अधिकाºयांची सही बाकी होती ती घेऊन संबंधितांना फाईल सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे आता लवकरच कर्मचाºयांना त्याचा लाभ मिळणार आहे.
- शशांक बांदकर, सरचिटणीस, अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनाअंतर्गत, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था