पवईत सुरू होणार जलक्रीडा? स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंग सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 03:55 AM2018-07-31T03:55:59+5:302018-07-31T03:56:07+5:30

सुशोभीकरणानंतर उपनगरातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या पवई तलावात आता जलक्रीडा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

 Pavite will start water sports? Scuba Diving, Water Polo, Boat Racing Facility | पवईत सुरू होणार जलक्रीडा? स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंग सुविधा

पवईत सुरू होणार जलक्रीडा? स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंग सुविधा

Next

मुंबई : सुशोभीकरणानंतर उपनगरातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या पवई तलावात आता जलक्रीडा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे़ स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंग आदी जलक्रीडा सुरू करण्याची मागणी होत आहे़ परंतु, या तलावामध्ये मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने जलक्रीडा सुरू करण्याबाबत महापालिकेची चाचपणी सुरू आहे़
१८९१मध्ये तयार करण्यात आलेला पवई तलाव २२० हेक्टर्स जागेत पसरलेला आहे़ या तलावातील पाण्याचा वापर पिण्याकरिता होत नसून, ते पाणी औद्योगिक कंपन्यांसाठी वापरले जात आहे. तसेच या तलावात मासेमारीही केली जाते. निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या तलाव परिसरात पर्यटकांची गर्दी असते़ त्यामुळे महापालिकेमार्फत या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे़ यामध्ये जलक्रीडाचाही समावेश करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे़
मात्र, मलवाहिन्या सुरूच असल्याने अद्यापही या तलावातील पाणी प्रदूषितच आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत या तलावातील मलवाहिनी बंद करून येथून सोडण्यात येणारे सांडपाणी दुसऱ्या मलवाहिनीतून वळविण्यात आल्यास या तलावातील पाणी स्वच्छ होईल़ त्यानंतर या तलावात जलक्रीडा सुरू करण्याबाबत पालिका अधिकारी चाचपणी करणार आहेत़
येथे जलक्रीडा सुविधा सुरू झाल्यास मुंबईकरांना मात्र स्कुबा डायव्हिंग, वॉटर पोलो, बोट रेसिंगचा आनंद घेता येणार आहे.

असे होणार सुशोभीकरण
तलावाचे पाणी दूषित होण्यापासून रोखणे, प्रदूषणमुक्त करून पाण्याचा दर्जा वाढविणे, जलचरांचे संवर्धन करणे अशा कामांचा समावेश आहे़ या तलावात मगरींचे प्रमाण अधिक असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र ‘मगर उद्यान’ तयार करण्याचेही प्रस्तावित होते़ त्यानुसार मगरींसाठी तलावात स्वतंत्र परिसर तयार करण्यात येणार आहे़ मात्र हा प्रकल्प बराच काळ रेंगाळला आहे़

महसूल वाढेल
मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात तलावांमध्ये स्कुबा डायव्हिंग, डायव्हिंग आॅफ स्पिंगबोडर्स, वॉटर अरोबिक्स, वॉटर पोलो, बोट रेसिंग आदींसारख्या विविध जलक्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्यास मुंबईकरांना एक चांगली मनोरंजनपर सुविधा उपलब्ध होईल़ त्याद्वारे मुंबई महापालिकेच्या महसुलातही भर पडेल, असे मत डॉ. सईदा खान यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत व्यक्त केले आहे़

अशी आहे अडचण
या तलावामध्ये एप्रिल २०१६मध्ये मगरीने मासेमारी करणाºयावर हल्ला केला होता. पवई तलावात मगरींची संख्या अधिक असल्यामुळे पवई तलाव मगरींचे उद्यान म्हणून घोषित करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे.

Web Title:  Pavite will start water sports? Scuba Diving, Water Polo, Boat Racing Facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई