घसरलेले रेल्वे इंजिन स्टॉपरवर धडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 11:03 AM2018-10-08T11:03:37+5:302018-10-08T11:08:23+5:30
लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 11062 पवन एक्स्प्रेसचे इंजिन रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 11062 पवन एक्स्प्रेसचे इंजिन रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. टर्मिनस येथील फलाटावर प्रवेश करत असताना इंजिन स्टॉपरवर जाऊन आदळले. या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.
सद्यस्थितीत इंजिन हटविण्याचे काम सुरू असून घटनास्थळी रिलीफ इंजिन दाखल झाले आहे. या घटनेमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या आणि एलटीटीकडे येणाऱ्या मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.