...आणि पवार आजी कुटुंबाला भेटल्या! तुटपुंज्या माहितीवरून घडवली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 02:03 AM2018-06-07T02:03:53+5:302018-06-07T02:03:53+5:30
वांद्रे पुलावर रात्रीच्या वेळी खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे गस्तीवर होते. तेव्हा ७५ वर्षांच्या आजी त्या ठिकाणी पदपथावर बसलेल्या त्यांना दिसल्या. पाटील यांनी त्यांची चौकशी केली.
- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : वांद्रे पुलावर रात्रीच्या वेळी खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे गस्तीवर होते. तेव्हा ७५ वर्षांच्या आजी त्या ठिकाणी पदपथावर बसलेल्या त्यांना दिसल्या. पाटील यांनी त्यांची चौकशी केली. स्मृतिभं्रशाचा आजार असल्याने त्यांना स्वत:चे नावही नीट सांगता येत नव्हते. बऱ्याच वेळाने त्यांना स्वत:चे आडनाव पवार आणि धारावी एवढेच आठवले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिच्या मुलींसोबत भेट घालून दिली.
मुळात एक हवालदार धारावीतून बदली होऊन खेरवाडी पोलीस ठाण्याला रुजू झाले होते, त्यामुळे आजींना त्यांच्यासोबत पाठविण्यात आले. मात्र पवार आजींना काहीच नीट सांगता येत नव्हते. अखेर पाटील यांनी सहकाºयांना सांगून एका स्वयंसेवी संस्थेमध्ये पवार आजींची राहण्याची व्यवस्था केली. याच दरम्यान त्यांच्या मुली आजींना शोधण्यासाठी धारावीत गेल्या. तेव्हा स्थनिकांनी आजींना पोलिसांसोबत पाहिले होते, त्यांनी त्या मुलींना खेरवाडी पोलिसांना संपर्क करण्याचे सुचविले. तेव्हा खेरवाडी पोलिसांनी पवार आजींना त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले.
खेरवाडी पोलीस ठाण्यांतर्गत संत ज्ञानेश्वर नगर, महाराष्ट्र नगर यांसारखे संवेदनशील भाग येतात. त्यामुळे त्या ठिकाणी गस्त घालणे, तक्रारींचे निरसन करणे, चेन स्नॅचिंग, बॅग लिफ्टिंग यांसारख्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्कता गस्त पोलिसांकडून घातली जाते.
तसेच खेरवाडीत वाहतुकीचे नियम मोडणाºयांना पोलिसांनी टार्गेट केले. पश्चिम द्रुतगती महामार्गावर आसपासच्या परिसरातून रॅश ड्राईव्ह करणाºया तरुणाच्या त्रासाने स्थानिकांच्या नाकी नऊ आणले होते. अखेर खेरवाडी पोलिसांनी याच्या विरोधात एक ‘विशेष मोहीम’ उघडत हे प्रकार बºयाच प्रमाणात नियंत्रणात आणले.
मनुष्यबळ :
खेरवाडी पोलीस ठाण्यात अंमलदार आणि कर्मचाºयांची संख्या १८६ आहे. हे मनुष्यबळ खेरवाडी पोलिसांच्या हद्दीत मोडणाºया २.२५ लाखांहून अधिक लोकसंख्येची जबाबदारी सांभाळत आहे.
अतिमहत्त्वाची ठिकाणे : खेरवाडी पोलिसांच्या हद्दीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने मोडतात. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा, एफडीए, औद्योगिक न्यायालय या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी खेरवाडी पोलिसांच्या खांद्यावर येते.
परिमंडळ - ०८
लोकसंख्या - २.१५ लाख
पोलीस उपायुक्त - अनिल कुंभारे
बीट चौकी - २
टीचर्स कॉलनी, ज्ञानेश्वर नगर आणि बिंबिसार नगर
तक्रारीसाठी संपर्क
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
राजेंद्र पाटील :
२६५७०८७७/१२१६
आमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि सहकर्मचाºयांनी दिलेल्या सहकार्यामुळे मला नेहमी प्रोत्साहन मिळते. त्यामुळे खेरवाडी पोलीस ठाण्याची जबाबदारी मी यशस्वीपणे सांभाळू शकतो.
- राजेंद्र पाटील - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खेरवाडी पोलीस ठाणे