Join us  

काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पवारांना पर्याय नाही, मुख्यमंत्र्यांचा खरमरीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 2:11 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांनी अगुस्ता वेस्टलँडप्रकरणी काँग्रेसच्या बाजुने आपले मत मांडले होते.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जबरी टीका केली आहे. अगुस्ता वेस्टलँडप्रकरणी बोलताना, शरद पवार हे काँग्रेसची वकिली करत आहेत. काँग्रेसला त्यांच्यासारखा मोठा वकिल लाभला आहे. तर, पवारांनाही काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा शरद पवार यांनी अगुस्ता वेस्टलँडप्रकरणी काँग्रेसच्या बाजूने आपले मत मांडले होते. देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी विरोधकांना संकटात आणण्यासाठी कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही. सध्याचे सरकार मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेत आहे. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर खरेदी गैरव्यवहारात युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले जात असून, विरोधकांना संपविण्याचा हा सरकारचा कट आहे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी रविवारी अहमदनगर येथे केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवारांच्या या टीकेचा समाचार घेतला आहे. अगुस्ता वेस्टलँडसारख्या व्हीव्हीआयपी घोटाळ्याबावर काँग्रेस परिवाराने उत्तरे द्यावी. आतापर्यंत तावातावाणे बोलणारे आता गप्प का, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला विचारला. तसेच काँग्रेसच्या बाजुने मत मांडणाऱ्या पवारांनाही फडणवीस यांनी लक्ष्य केलं.  पवारांना काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय उरला नाही, असा खरमरीत टोला फडणवीस यांनी लगावला.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशरद पवारऑगस्टा वेस्टलँड घोटाळा