हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 09:13 AM2020-07-13T09:13:02+5:302020-07-13T09:23:38+5:30
ला स्वतःला असं वाटतं की, कोरोनाचं संकट एकदा कमी झालं आणि पार्लमेंट सुरू झाली की या कामाला गती येईल. देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये एक भावना अशी आहे की, आपण एकत्र बसलं पाहिजे.
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनासाठी संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. या दीर्घ मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.(Sharad Pawar Interview With Sanjay Raut) संपूर्ण देशामध्ये विरोधी पक्षाला फार जाग आलेली दिसत नाही. अनेक प्रश्नांवर विरोधी पक्ष हा विखुरलेला आहे. विरोधी पक्ष भविष्यामध्ये एकत्र येऊन काही देशासमोर चांगलं काम उभं करणार का? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला, (Sharad Pawar Interview With Sanjay Raut)त्यावर पवार म्हणाले, मला स्वतःला असं वाटतं की, कोरोनाचं संकट एकदा कमी झालं आणि पार्लमेंट सुरू झाली की या कामाला गती येईल. देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये एक भावना अशी आहे की, आपण एकत्र बसलं पाहिजे.
आपण एकत्र बसून एक निश्चित कार्यक्रम ठरवून देशवासीयांच्या समोर एक पर्याय दिला पाहिजे आणि तो पर्याय देण्याची कुवत आजच्या विरोधी पक्षनेत्यांत आणि त्यांच्या ऐक्यात निश्चितपणे आहे, पण सगळे पक्ष कोरोनाकडे डायव्हर्ट झाल्यामुळे आज हे काम थांबलेलं आहे. कोरोनाचे संकट येण्याच्यापूर्वी देशातील विरोधी पक्षांचे लोक दोनदा एकत्र बसले, चर्चा केल्या. काही गोष्टींची धोरणे ठरवण्याच्या दृष्टीने विचार केला आणि नंतर हे सगळं चित्र बदललं या रोगामुळे, पण माझी खात्री आहे की, एकदा पार्लमेंट सुरू झाल्यानंतर देशातल्या सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करणं, त्याबद्दलची भूमिका घ्यावी लागेल.
माझ्यासारखी व्यक्ती त्यात अधिक लक्ष देईल. मला याबाबतीत कमीपणा नाही कोणालाही भेटायला. सगळ्यांना भेटून आपण एका विचाराने आज पर्याय देऊ शकलो तर तो देणं ही राष्ट्रीय गरज आहे आणि ती राष्ट्रीय गरज पूर्ण करण्यासाठी कशाचीही अपेक्षा न करता मी आणि आणखीन अनेक पक्षांचे सहकारी याबाबतीत या विषयावर विचार करत आहोत आणि त्याची अंमलबजावणी आम्ही सुरू करू, असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.
हेही वाचा
रस्त्यावर लवकरच धावणार CNG इनोव्हा कार; जाणून घ्या किंमत अन् लाँचिंगची तारीख
टेन्शन वाढलं! डिझेल पुन्हा एकदा पेट्रोलपेक्षा महागलं; प्रतिलिटरची किंमत 81.05 रुपयांवर
CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार
भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला
...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'