Join us

पैसे द्या, पाणी विकत घ्या! कोळीवाड्यांसह मुंबईत पाणीबाणी, नागरिकांची सुरू आहे वणवण

By मनोहर कुंभेजकर | Published: April 10, 2023 7:49 AM

मुंबईकरांवर पाणी संकट कोसळले आहे.

मुंबई :

वाढत्या उन्हाळ्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांना गळती लागल्याने मुंबईकरांवर पाणी संकट कोसळले आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कोळीवाड्यांसह शहर व मुंबई पूर्व  उपनगरात १५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी कपात करण्यात आल्याने रहिवाशांवर पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पालिकेकडून कोणतीही सोय केली जात नसल्याने रहिवाशांची मात्र पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे. 

पाणी गळतीमुळे पालिका प्रशासनाकडून महिनाभर मुंबईत १५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा फटका पश्चिम उपनगरातील खारदांडा, मढ व भाटी, गोराई आदी विविध कोळीवाड्यांना बसला आहे. याशिवाय दादर, प्रभादेवी, अंधेरी, मालाड, गोवंडी, मानखुर्द या भागात पालिकेकडून अनियमित पाणीपुरवठा सुरू आहे. कधी पाणी येते तर त्याला प्रवाह नसतो तर काही वेळेला पाणी ठरलेल्या वेळेत येत नाही अशी परिस्थिती मुंबईत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मालाडच्या मढ भागात गेले काही दिवस पाणीच येत नसल्याने तेथील नागरिकांना पाण्याचा २० लिटरचा कॅन १५ ते २० रुपयांना विकत घेऊन दिवस ढकलावा लागत आहे.

अनधिकृत जोडण्यामनोरी, कुलवेम व  गोराई गावात समुद्राखालून पाइपलाइन टाकून येथील नागरिकांना पाणीपुरवठा केला. मात्र गेल्या २० वर्षात येथील वाढलेली लोकसंख्या व हॉटेलच्या अनधिकृत जलजोडण्यांमुळे गोराई गावात टंचाई निर्माण झाल्याची माहिती आमदार सुनील राणे यांनी दिली.

कमी दाबाने पाणीपुरवठाखार दांडा कोळीवाड्यात पाणी पुरवठा कमी होत असून अत्यंत कमी दाबाने पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाल्याची माहिती खार दांडा कोळीवाडा गावठाण संघाचे सचिव मनोज कोळी यांनी दिली.

आम्हाला काटकसर शिकविता, तुम्ही किती नासाडी करतामुलुंडच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण पाणी वाहून आणणाऱ्या या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने हाती घेण्यात आले. एकूण १२ अभियंता आणि ३० कर्मचाऱ्यांच्या मदतीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. 

मुलुंड जकात नाका येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तर्फे पर्जन्य जलवाहिनीचे काम सुरू असताना मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेल्या आठवड्यात फुटली, तर भांडूप संकुल जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाण्यात गळती लागली. या गळतीमुळे पाण्याची प्रचंड नासाडी झाली. याचा परिणाम म्हणून मुंबई महापालिकेने १५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, याची झळ मुंबईकरांना सोसावी लागत असून मुंबईच्या अनेक भागात ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी कपात सुरू आहे.

मुलुंड जकात नाका परिसरात हरिओमनगर येथील मुंबई महापालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई - २’ जलवाहिनीला एमएसआरडीसीतर्फे बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरू असताना गळती लागली, तर महापालिकेंतर्गत मुंबई शहर व उपनगराच्या एकूण पाणीपुरवठ्यापैकी सुमारे ६५ टक्के पाणीपुरवठा हा भांडूप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राद्वारे केला जातो. 

या केंद्रास होणारा ७५ टक्के पाणीपुरवठा ५ हजार ५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याद्वारे होतो. कूपनलिकेच्या खोदकामामुळे गळती लागली. 

दादर प्रभादेवीत ठणठणाटदादर, प्रभादेवी, सायन, मालाड परिसरात ठणठणाट असल्याने येथील रहिवाशांचे गेले काही दिवस हाल सुरू आहेत.

या भागात पाण्याची टंचाईमढगाव व भाटी, मढ शिवाजीनगर, जेट्टी, बापतीस चर्च, वानेला तलाव अशा विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसून नागरिकांची गैरसोय होत आहे, अशी माहिती भारतीय मच्छिमार काँग्रेसचे महासचिव संतोष कोळी यांनी दिली. तर मढ गावातील विविध भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी दिली. प्रशासनाने लक्ष घालून टंचाई दूर करण्याची मागणी त्यांनी केली.

टॅग्स :पाणीकपात