कंत्राटी कर्मचा-यांना थेट वेतन द्या, राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:11 PM2019-05-19T22:11:16+5:302019-05-19T22:11:22+5:30
अन्य मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्यावतीने कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्याकडे साकडे घालण्यात आले आहे.
मुंबई: राज्यातील बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचा-यांना थेट वेतन देण्यात यावे , या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांच्याकडे साकडे घालण्यात आले आहे. महासंघाचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुल्लाणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळांने शनिवारी त्यांची भेट घेवून ही मागणी केली. यावेळी सचिवांनी कामगारांच्या वेतनाबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
राज्य सरकारने वित्त विभागाच्या धोरणानुसार शासनाचा खर्च वाचवण्यासाठी राज्यातील विविध शासकीय कार्यालयात बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे विविध पदांवर कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत तसेच घेतला ही जात आहे. परंतु, शासनाच्या निर्णयाप्रमाणे संबंधित कार्यालयाने ठरवलेल्या वेतनानुसार त्वरयनर वेतन मिळत नाही, यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शासकीय विभागात तथा विभागांतर्गत कार्यालयात कंत्राटदारामार्फत कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले आहेत. अशा सर्व कंत्राटी कर्मचाºयांना त्यांनी केलेल्या कामाच्या दिवसानुसार महिन्याकाठी कंत्राटदाराने संबंधितांच्या बँक खात्यात वेतन जमा करणे आवश्यक आहे तसेच, सर्व कंत्राटी कर्मचाºयांच्या वेतनातून वैधानिक देणी / वजावटी कापून घेऊन त्या संबंधित कंत्राटी कर्मचाºयांच्या वैधानिक देणी जमा करण्याच्या खात्यांमध्ये असा नियम असताना त्याची पायमल्ली होत असल्याचे मुल्लाणी यांनी निदर्शनास आणले.
यावेळी राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकूंद जाधवर, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, सरचिटणीस शहाजी नलवडे, सहकार्याध्यक्ष सचिन पाटील आदी उपस्थित होते.