Join us

वीज बिल भरा व्याजमुक्त हप्त्याने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 6:46 PM

Light Bill : व्याजमुक्त ईएमआय पर्यायाला ३० ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

मुंबई : कोरोनाच्या काळात वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बिले आली. साहजिकच या काळात रोजगार नसल्याने आणि खुप बिले आल्याने ग्राहकांनी वीज बिले भरली नाहीत. वीज ग्राहकावर ताण नको म्हणून वीज कंपन्यांनी वीज ग्राहकांना वीज बिल व्याजमुक्त हप्त्याने भरण्याची संधी दिली. आता याबाबतची मुदत संपत असतानाच अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने आपल्या तात्पुरत्या काळासाठी दिलेल्या व्याजमुक्त ईएमआय सुविधेला ३० ऑक्टोबर या काळासाठी मुदतवाढ दिली आहे.ग्राहकांच्या बिलांबद्दलच्या चिंता दूर करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे ग्राहक आता त्यांची बिले भरण्यासाठी ईएमआय पर्याय उपलब्ध करून घेऊ शकतात. वीजपुरवठ्यातील गैरसोय टाळू शकतात. ग्राहक आपली थकबाकीची रक्कम भरण्यासाठी तीन मोफत ईएमआय उपलब्ध करून घेण्यास पात्र आहेत. यापूर्वी ईएमआय सुविधेचा पर्याय न स्वीकारलेले ग्राहक आता वेबसाइटवरील, कॉल सेंटरवरील किंवा ग्राहकसेवा केंद्रावरील किऑस्कवर जाऊन या सुविधेसाठी नोंदणी करू शकतात. दरम्यान, व्याजमुक्त ईएमआय पर्यायाला केवळ सध्याच्या महिन्यापुरती मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :वीजमुंबई