थकबाकीसाठी हप्ते द्या, वीजपुरवठा खंडित करू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:06 AM2021-05-31T04:06:05+5:302021-05-31T04:06:05+5:30

वीज ग्राहक संघटनेची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या वर्षी औद्योगिक ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी महावितरणने हप्ते धोरण जाहीर ...

Pay installments for arrears, don't cut off power supply! | थकबाकीसाठी हप्ते द्या, वीजपुरवठा खंडित करू नका !

थकबाकीसाठी हप्ते द्या, वीजपुरवठा खंडित करू नका !

Next

वीज ग्राहक संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या वर्षी औद्योगिक ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी महावितरणने हप्ते धोरण जाहीर केले होते. या वर्षी एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू असूनही अद्यापही हप्ते धोरण नाही. उलट वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, अशा नोटिसा दिल्या जात आहेत. मात्र, काेराेनाकाळ लक्षात घेता थकबाकीसाठी हप्ते द्या, वीजपुरवठा खंडित करू नका, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेने केली आहे.

कोरोनामुळे उद्योग कोंडीत सापडले आहेत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सरकारने महावितरण कंपनीमार्फत त्वरित हप्ते धोरण लागू करावे. थकबाकी रकमेसाठी डाउन पेमेंट १० टक्के करावे. उर्वरित रकमेसाठी १२ समान मासिक हप्ते द्यावेत. गतवर्षीच्या अर्जदार ग्राहकांचा योजनेत समावेश करावा, अशा मागण्या विविध औद्योगिक संघटनांच्या वतीने सरकारकडे करण्यात आल्या आहेत. महावितरणने कृषिपंप वगळता अन्य सर्व प्रकारच्या वीजग्राहकांसाठी इन्स्टॉलमेंट पॉलिसी परिपत्रक जाहीर केले होते. ३१ मार्च २०२१ नंतर ही हप्ते योजना बंद आहे, असे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.

............................

Web Title: Pay installments for arrears, don't cut off power supply!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.