एक मृतदेह पुरण्यासाठीचा खड्डा खणण्याकरिता एक हजार रुपये द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 02:36 AM2020-08-21T02:36:47+5:302020-08-21T02:36:53+5:30

लिंगायत समाजात मृतदेह पुरण्याचा विधी केला जातो. अशा वेळी या दोन मृतदेहांकरिता खड्डा खणण्यासाठी येथे पैशांची मागणी करण्यात आली.

Pay a thousand rupees for digging a pit to bury a dead body! | एक मृतदेह पुरण्यासाठीचा खड्डा खणण्याकरिता एक हजार रुपये द्या!

एक मृतदेह पुरण्यासाठीचा खड्डा खणण्याकरिता एक हजार रुपये द्या!

Next

मुंबई : कुर्ला पश्चिम येथील सोनापूर लेन स्मशानभूमीत वीरशैव लिंगायत, जंगम, समाजातील मृतदेहांवरील अंत्यसंस्कारांतर्गंत क्रिया करण्यासाठी पैशांची मागणी केली जात असल्याची तक्रार समोर आली आहे. दुर्दैव म्हणजे एक मृतदेह पुरण्यासाठीचा खड्डा खणण्यासाठी हजार रुपयांची मागणी केली जात असून, हा प्रकार म्हणजे मृतदेहाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा असल्याची टीका केली जात आहे.
मुंबई महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांचा मृतदेह आल्यानंतर त्यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये सुविधा दिल्या आहेत. मात्र मुंबईतील लिंगायत समाजाचे प्रतिनिधी राकेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील हा प्रकार निंदनीय आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कुर्ला येथील सोनापूर लेनमधील स्मशानभूमीत या महिन्यात लिंगायत समाजातील दोन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी दाखल करण्यात आले होते. लिंगायत समाजात मृतदेह पुरण्याचा विधी केला जातो. अशा वेळी या दोन मृतदेहांकरिता खड्डा खणण्यासाठी येथे पैशांची मागणी करण्यात आली.
मुळात कसे आहे की, एखाद्याकडून स्वमर्जीने पैसे देणे हा भाग वेगळा आहे आणि दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबाकडून मृतदेहावरील अंत्यसंस्कारासाठीच्या विधीसाठी पैसे मागणे हे उचित नाही.
मुळात महापालिका अशा कोणत्याच विधीसाठी पैसे आकारत नाही. मग येथील कर्मचारी असे का वागतात, हे न उलगडणारे कोडे आहे. आम्हाला कोणाच्याही पोटावर पाय द्यायचा नाही. मात्र चुकीच्या गोष्टी होऊ नयेत एवढेच आमचे म्हणणे आहे. लिंगायत समाजाकडून याचा निषेध करण्यात आला असून, आम्ही ही घटना महापालिकेच्या
कानावर घातली आहे. त्यांनी याप्रकरणांत संबंधितांची कानउघाडणी करावी.
दरम्यान, मुंबईतील सर्व वीरशैव लिंगायत, जंगम, जाती, पोटजाती यांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या येथील स्मशानभूमीमध्ये असे प्रकार घडत असतील तर आपण त्यांची तक्रार करावी़
>चंदनवाडी, वैकुंठधाम, भोईवाडा, हेन्स रोड, शिवाजी पार्क, जोगेश्वरी येथील ओशिवरा, डहाणूकरवाडी, दौलत नगर, चरई, विक्रोळी येथील टागोर नगर या १० ठिकाणी विद्युत दहन भूमी आहेत.
गॅस शव दाहिनीची सुविधा ४ स्मशानभूमीमध्ये सुरु करण्यात आली आहे. यात डहाणूकरवाडी स्मशानभूमी, दौलतनगर स्मशानभूमी, चरई स्मशानभूमी, सायन स्मशानभूमीचा समावेश असून, उर्वरित ९ स्मशानभूमींमध्ये टप्प्याटप्प्याने ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.
२१० स्मशानभूमींमध्ये मृतदेहांवर अत्यंसंस्कार
मुंबईत ४९ हिंदू स्मशानभूमी
२० मुस्लिम दफनभूमी
१२ ख्रिश्चन दफनभूमी
खासगी २० हिंदु स्मशानभूमी
५० मुस्लिम दफनभूमी
३८ ख्रिश्चन दफनभूमी
७ इतर धमीर्यांच्या स्मशानभूमी
१० विद्युत दाहिनी आणि ४ स्मशानभूमी

Web Title: Pay a thousand rupees for digging a pit to bury a dead body!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.