निखिल म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : निसर्ग चक्रीवादळ सुरुवातीला हरिहरेश्वरला धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र त्याने हुलकावणी देत अंदाज चुकवले आणि ते मुरूडला धडकले.
बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हे चक्रीवादळ रायगडच्या दक्षिण किनारपट्टीवर आदळले तेव्हा ताशी १०० किमी वेगाने वारे वाहत होते. चक्रीवादळाची तीव्रता ही मुरुड तालुक्याच्या ६० किमीच्या परिघात मुरुड, रोहा, नागोठणे आणि अलिबागला जबरदस्त फटका बसला. विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली, घरांचे छप्पर उडून गेले, विद्युत पोल पडल्याच्याही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीती होती. दुपारी दोन वाजल्यानंतर चक्रीवादळाने आपला मोर्चा पेण, उरणकडे वळवला होता.
पहाटेपासूनच अलिबागकरांना हुरहुर लागली होती ती, दुपारी एक वाजता धडकणाऱ्या चक्रीवादळाची. परंतू चक्रीवादळाने मुरुड तालुक्यात धडक दिली. मुरुड तालुक्याला वादळाचा जोरदार तडाखा बसला.श्रीवर्धन, हरीहरेश्वर, मुरुड, रोहा, नागोठणे मार्गे अलिबागच्या समुद्र किनाºयावर दुपारी १ च्या सुमारास चक्रीवादळाची छाया दिसली. सततच्या सोसाट्याच्या वाºयामुळे शहरातील अरूण कुमार वैद्य हायस्कूल, वरसोली बीच, ब्राम्हण आळी रोड, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, वन विभाग कार्यालयाजळ तर शिवाजी चौकातील पुरातन वडाचे झाड कोसळले वीज खंडित, मोबाइल बंदसकाळपासूनच शहरातील वीज, इंटरनेट, मोबाइल नेटवर्क विस्कळीत झाले होते. चक्रीवादळामुळे जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली.शेतजमीन पाण्याखाली, घराचे पत्रे उडालेच्सतत पाऊस पडत असल्याने भात शेतजमीन पाण्याने भरली होती. तर पावसाबरोबरच सुरू असल्याने सोसाट्याच्या वाºयामुळे अनेकांच्या घराच्या छपराचे पत्रे उडाले. त्यामुळे घरातील पाणी काढण्यासाठी बाधित कुटुंबाची धावपळ उडाली होती. तर नागाव अलिबाग रस्त्यावर झाडे पडल्याने काही काळ रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.च्जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर असलेले जुने टाकल्याचे झाड मुळासकट अचानक खाली कोसळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येण्या-जाण्याचा मार्गा बंद करण्यात आला होता.मुंबईत झाडे कोसळलीचक्रीवादळ येण्यापूर्वीच पावसामुळे बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या मुंबई शहरात २४ तासांत शहर विभागात १२, पूर्व उपनगरात ७ तर पश्चिम उपनगरात १८ अशा एकूण ३७ ठिकाणी झाडे कोसळली. एकूण १९६ ठिकाणी झाडे कोसळली. तर, २० ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. मात्र जीवितहानी झाली नाही.आज मध्यम तेजोरदार पाऊस पडणारमुंबई पालिकेच्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ६ पर्यंत कुलाबा वेधशाळेत ४६.७ मिमी तर सांताक्रूझ वेधशाळेत २२.८ मिमी पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासांत शहर, उपनगरात वादळी वाºयासह मध्यम ते जोरदार पाऊस पडले. काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होईल.