पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ करणे बेतले तृतीयपंथीच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 02:37 AM2019-07-30T02:37:45+5:302019-07-30T02:37:49+5:30

राखी शिंदे उर्फ किशोर पोटे असे हत्या करण्यात आलेल्या तृतीयपंथीचे नाव आहे.

Paying no money is a bad thing to do | पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ करणे बेतले तृतीयपंथीच्या जीवावर

पैसे दिले नाही म्हणून शिवीगाळ करणे बेतले तृतीयपंथीच्या जीवावर

Next

मुंबई : पैसे देण्यास नकार दिल्याने शिवीगाळ करणे एका तृतीयपंथीच्या जीवावर बेतले. चार तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली, त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पसार आरोपीचा शोध सुरू आहे.

राखी शिंदे उर्फ किशोर पोटे असे हत्या करण्यात आलेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. बोरीवलीच्या सरदार वल्लभभाई पटेल रोड जंक्शनजवळ ३ जुलै रोजी हा प्रकार घडला. सिग्नलजवळ कारमध्ये बसलेल्या दोन तरुणांकडे शिंदेने पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा शिंदे तेथून निघून गेली, मात्र जाता जाता तिने त्यांच्यासाठी काही अपशब्द उच्चारला. तो त्यांनी ऐकला आणि फोन करून त्वरित आणखी दोघांना तेथे बोलावून घेतले. त्यानंतर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या शिंदेला त्यांनी बेदम मारहाण केली आणि पसार झाले. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी शिंदेला रुग्णालयात दाखल करत, अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. रुग्णालयात उपचारादरम्यान शिंदेचा २२ जुलै रोजी मृत्यू झाला. त्यानुसार या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाअंती बिलाल मोमीन, आफ्रिदी शेख आणि मेहमूद शेख या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. चौथ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

Web Title: Paying no money is a bad thing to do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.