३ सप्टेंबरपासून सुरू होणार मनःशांतीचा कोर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 01:13 PM2022-08-28T13:13:59+5:302022-08-28T13:16:08+5:30

एकीकडे टीबीशी लढा आणि दुसरीकढे कुटुंबाचा व्यवसाय पुन्हा जोमात सुरू करण्याचे चॅलेंज. अशा परिस्थितीतही श्रेयंस डागा यांनी वर्षभरानंतर आपल्या आरोग्याशी संबंधित समस्येवर तर मात केलीच, शिवाय कार्यरत नसलेली फॅक्टरीही जोमात सुरू केली.

Peace of mind course will start from 3rd September | ३ सप्टेंबरपासून सुरू होणार मनःशांतीचा कोर्स

३ सप्टेंबरपासून सुरू होणार मनःशांतीचा कोर्स

googlenewsNext

 
मुंबई : एकीकडे टीबीशी लढा आणि दुसरीकढे कुटुंबाचा व्यवसाय पुन्हा जोमात सुरू करण्याचे चॅलेंज. अशा परिस्थितीतही श्रेयंस डागा यांनी वर्षभरानंतर आपल्या आरोग्याशी संबंधित समस्येवर तर मात केलीच, शिवाय कार्यरत नसलेली फॅक्टरीही जोमात सुरू केली. हे कसे शक्य झाले? श्रेयंस डागा यांनी त्यासाठी मनःशांती आणि चिंतन केले. 
येत्या दोन दशकांमध्ये त्यांचा व्यवसाय अडीचशे पट वाढवण्याचा निर्धार आहे. या सर्व गोष्टींसाठी त्यांनी सतत केले ते मेडिटेशन. नियोजनबद्ध कसे जगता येईल याची सवय त्यांनी स्वतःला लावून घेतली. त्यांनी स्वतःमध्ये  बदल केले आणि लॉ ऑफ  ॲट्रॅक्शन कसे काम करते, हे स्वतःवर सिद्ध केले. त्यानंतर त्यांच्या आसपासचे सारेच सक्सेस मंत्राबद्दल विचारणा करू लागले. 
याच संकल्पनेतून मग वरूण डागा, कौशिक डागा आणि ऋषभ शेठ यांच्यासह श्रेयंस डागा फाउंडेशनचा जन्म झाला. यशाचा मंत्र 
शक्य तितक्या लोकांपर्यंत मोफत पोहोचवावा आणि त्यातून लोकांना फायदा व्हावा, हा या फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रॅक्टिकल ॲप्रोच, सिद्ध झालेल्या पद्धती हे फाउंडेशन इतरांपेक्षा विशेष ठरते. 
मुंबईतील श्रेयंस डागा फाऊंडेशनने (एसडीएफ) २८ दिवसांच्या एका अभिनव मेडिटेशन (चिंतन) कार्यक्रमाची रचना केली आहे. हे ऑनलाइन प्रशिक्षण असून त्यासाठी प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये असलेला हा कोर्स ३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासंदर्भात events.shreansdaga.org येथे नोंदणी करता येईल. 

Web Title: Peace of mind course will start from 3rd September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई