पनवेल अर्बनवर शेकापची एकहाती सत्ता

By admin | Published: May 24, 2015 10:50 PM2015-05-24T22:50:06+5:302015-05-24T22:50:06+5:30

पनवेल परिसरात प्रतिष्ठेच्या बनलेल्या पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत शेकाप आघाडीच्या प्रगती विकास पॅनेलने भाजपा आणि सेना युतीच्या सहकार विकास

Peacock's coalition power over Panvel Urban | पनवेल अर्बनवर शेकापची एकहाती सत्ता

पनवेल अर्बनवर शेकापची एकहाती सत्ता

Next

पनवेल : पनवेल परिसरात प्रतिष्ठेच्या बनलेल्या पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत शेकाप आघाडीच्या प्रगती विकास पॅनेलने भाजपा आणि सेना युतीच्या सहकार विकास पॅनेलला सर्वच्या सर्व तेरा जागांवर पराभूत करून एकहाती सत्ता मिळवली असून भाजपा युतीला भोपळा फोडता आला नाही.
पनवेल अर्बन बँकेवर पूर्वीपासून शेकापचे व नंतरच्या गेल्या काळात शेकाप भाजपाचे वर्चस्व राहिले होते. सतरा वर्षांनंतर प्रथमच या बँकेची निवडणूक होणार होती. यासाठी आगळ्या वेगळ्या युत्या आघाड्या नागरिकांना पाहायला मिळाल्या.
गेल्या काही वर्षांत मात्र अन्य पक्षाचे पदाधिकारी देखील बिनविरोध निवडून संचालक मंडळावर जाऊ लागले होते. परंतु त्यानंतरही बँकेची स्थिती हवी तशी करता आली नाही. यावेळी झालेल्या निवडणुकीत १४ हजार २९८ पैकी ५ हजार ७१५ मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.
या निवडणुकीत सर्वसाधारण गटात ५ हजार ७१५ पंधरा जणांनी मतदान केले. त्यापैकी ५ हजार ५२७ मते वैध ठरली व १८८ मते बाद ठरली. यामध्ये द्वारकानाथ भगत यांना २ हजार ९३२ , अविनाश दांडेकर यांना २ हजार ९0९, अनिल जाधव २ हजार ८९३, अजय कांडपिळे यांना २ हजार ९६४, अनिल केणी २ हजार ८८८, राजेश खानावकर २ हजार ८३0, बाबुराव पालकर २ हजार ७९४, हितेन शहा २ हजार ८४६ हे प्रगती सहकार पॅनेलचे उमेदवार निवडून आले तर त्यांच्या समोरील प्रभाकर आघारकर यांना २ हजार ४१२, अरु ण भगत २ हजार ५७८, गुलाब भगत २ हजार ३९0, शिरीष बुटाला २ हजार ५४१, प्रवीण जाधव २ हजार ५८९, किरण मनोरे २ हजार ४९५ तर बँकेचे विद्यमान अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांना सर्वात कमी म्हणजे २ हजार ३८६ मते मिळाली.
महिला सर्वसाधारण गटात ५ हजार ७00 जणांनी मतदान केले त्यापैकी ५ हजार ५७८ मते वैध ठरली तर १२२ मते बाद ठरली. यामध्ये विद्या चव्हाण यांना २ हजार ९३७, माधुरी गोसावी यांना २ हजार ९५६, सुहासिनी केकाणे २ हजार ४२३, मुग्ध ओझे यांना २ हजार ५४१ मते मिळाली. महिला गटात माधुरी गोसावी व विद्या चव्हाण या शेकाप आघाडीच्या उमेदवार निवडून आल्या.
नागरिकांचा मागास प्रवर्ग गटात ५ हजार ७१२ जणांनी मतदान केले त्यापैकी ५ हजार ५१८ मते वैध ठरली तर २0२ मते बात ठरली. यामध्ये जनार्दन पाटील २ हजार ८६८ मते मिळवून विजयी झाले तर पराभूत उमेदवार रमेश गुडेकर यांना २ हजार ६३१ मते मिळाली.
अनुसूचित जाती गटात ५ हजार ७११ जणांनी मतदान केले त्यापैकी ५ हजार ५३२ मते वैध ठरली तर १७९ मते बाद ठरली. यामध्ये सुरेश बिहरा हे सर्वाधिक ३ हजार १८ मते घेऊन विजयी झाले तर पराभूत उमेदवार विश्वनाथ कोळी यांना २ हजार ५१४ मते मिळाली.
मागास वर्ग गटात ५ हजार ७१५ जणांनी मतदान केले, त्यापैकी ५ हजार ४६0 मते वैध तर २५५ मते बाद ठरली. यामध्ये अरविंद सावळेकर यांना ३ हजार १७ मते मिळवून ते विजयी झाले तर पराभूत उमेदवार तानाजी खंडागळे यांना २ हजार ४0८, निलेश सोनावणे यांना ३७ मते मिळाली.
एकूण १३ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत एकाही ठिकाणी शेकाप - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रगती सहकार पॅनेलने भाजपा - सेना युतीच्या सहकार विकास पॅनेलला जिंकू दिले नाही. सकाळी ९ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली होती. सहकार क्षेत्रात सत्ता आल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Peacock's coalition power over Panvel Urban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.