मुंबई : गेल्या काही दिवसांत भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात ५ ते १० रुपयांची घसरण झाली झाली आहे, तर वाटाणा, फ्लॉवरची आवक कमी झाल्याने महाग झाले आहेत.
मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे.
भाज्यांचे दर
मेथी १५ , शेपू १५, लालमठ १० ,पालक १५, कोथिंबीर २० जुडी मिळत आहे, तर वाल ६० रुपये किलो मिळत आहे. टोमॅटो ३०, मिरची ५० रुपये किलो दराने मिळत आहे. आवक कमी झाल्याने वाटाणा १०० आणि फ्लॉवर ८० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.
--
गेल्या काही दिवसात भाज्यांचे उत्पन्न वाढले आहे. भाज्या जास्त दिवस ठेवता येत नाहीत. खराब झाली तर फेकून द्यावी लागते. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावाने विकत आहेत. आम्हीही जास्त भाज्या आल्यामुळे स्वस्त दरात देत आहोत.
सुशांत करंडे, भाजी विक्रेता