मटार, भेंडी, गाजर पुन्हा स्वस्त; दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:39 PM2024-01-05T12:39:40+5:302024-01-05T12:40:58+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी ६५६ वाहनांमधून २६७२ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे.

Peas, okra, carrots cheap again; A big relief for the customers due to the reduction in rates | मटार, भेंडी, गाजर पुन्हा स्वस्त; दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा

मटार, भेंडी, गाजर पुन्हा स्वस्त; दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा

नवी मुंबई : वाहतूकदारांच्या संपामुळे आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले होते. गुरुवारी पुन्हा आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आले असून दर  कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी ६५६ वाहनांमधून २६७२ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ५७ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. बुधवारी ५४७ वाहनांमधून २०२८ टन आवक झाली होती. पुणे, नाशिकसह  देशाच्या विविध भागातून आवकही सुरू झाली आहे. आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

संपामुळे आवक 
कमी, वाढला भाव 
-  वाहतूकदारांच्या संपामुळे मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्याने दर वाढले होते. आवक सुरळीत झाल्याने दर घसरले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
-  भेंडीचे दर प्रतिकिलो ३० ते ५५ वरून २५ ते ४५ रुपये किलोवर आले आहेत. दुधी भोपळा २४ ते ३२ वरून १५ ते २० वर आले आहेत. फरसबी ४७ ते ५७ वरून ३० ते ४० रुपयांवर आले आहेत. 
-  फ्लॉवर, गाजर, गवार, घेवडा, कोबी, ढोबळी मिर्ची, शेवगा शेंग, वाटाणा यांचे दरही घसरले आहेत. 

मुंबई बाजार समितीमधील  भाजीपाल्याचे दर पुढील प्रमाणे

Web Title: Peas, okra, carrots cheap again; A big relief for the customers due to the reduction in rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई